Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

नवी सांगवीतील आदर्श नगरच्या महिलांचा एक हात मदतीचा … अंध अपंगांना पुरणपोळी देऊन ‘रॉबीनहूड आर्मी’ ने केली आगळी वेगळी होळी पौर्णिमा!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड मधील रॉबिन हूड आर्मी सांगवी यांच्या तर्फ़े २८ मार्च २०२१ होळी पौर्णिमेच्या दिवशी आयोजित एक हात मदतीचा या कार्यक्रमाध्ये– आदर्श नगर, नवी सांगवी मधल्या सर्व माहिलांनी होळीच्या दिवशी होळीला पुरणपोळी चा नैवेद्य दाखवून होळी साजरी करत, त्या नैवेद्या बरोबर अजून एक पुरपोळी रॉबिन हूड आर्मी ला दिली.

अशा प्रकारे आदर्श नगर नवी सांगवी मधल्या सर्व माहिलांनी कोरोनाच्या काळातील होळी वेगळ्या प्रकारे साजरी करत जमा झालेल्या सर्व प्रकारच्या पुरण पोळ्या, अशा मुलांना दिल्या की त्यांनी त्या केव्हा पाहिल्याही नसतील, हे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होते. त्या निरागस चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले होते. पिंपळे गुरव येथील ममता अंध अनाथ केंद्रात जाऊन त्यांनी तेथील अंध अनाथ मुलांना जेवताना वाढल्याने त्यां मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पहायला मिळाला.

Google Ad

या सर्व काय्रक्रमाचे आयोजन रॉबिन हूड आर्मी च्या भारती आंगळे व सामाजिक कार्यकर्ते निखिल चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या सोबत रॉबिन हूड आर्मी चे सभासद आणि धनश्री निखिल चव्हाण, रोहित खंडागळे, व इतर मान्यवर उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

4 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!