Google Ad
Editor Choice

बंगालमध्ये वाघिणीचीच डरकाळी … पुद्दुचेरी , आसाममध्ये भाजप , केरळात डावे ; तमिळनाडूत द्रमुक

महाराष्ट्र 14 न्यूज : देशातील चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशापैकी पुद्दुरेची, तमिळनाडूत सत्तांतर झाले. पश्‍चिम बंगालमध्ये भाजपने मुसंडी मारली …

देशातील चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशापैकी पुद्दुरेची, तमिळनाडूत सत्तांतर झाले. पश्‍चिम बंगालमध्ये भाजपने मुसंडी मारली असली, तरी त्याला 75 वर रोखण्यात तृणमूल काँग्रेसला यश आले आहे. पाच वर्षांपूवीपेक्षाही तृणमूल काँग्रेसच्या जागांत वाढ झाली आहे. दुसरीकडे आसाम, पुद्दुचेरीत भाजपला सत्ता मिळाली, तर केरळमध्ये परंपरा मोडीत काढीत डाव्यांनी सलग दुसर्‍यांदा सत्ता आणली आहेत.

Google Ad

पश्‍चिम बंगाल वगळता इतर तीन राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे.

केरळमध्ये राजकीय इतिहासाला कलाटणी मिळाली आहे. पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील सरकारला जनतेने बहुमत दिले आहे. एलडीएफने 93 जागांवर आघाडी घेतलेली आहे, तर यूडीएफला पुन्हा एकदा विरोधी बाकांवर बसावे लागणार आहे. यूडीएफ 43 जागांवर आघाडीवर आहे. भारतीय जनता पक्षाला हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या जागाही मिळाल्या नाहीत. आसामात भाजपने दणदणीत घरवापसी केली आहे. काँग्रेस आणि भाजपत चुरस होती; मात्र भाजपने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली. भाजपने बहुमताचा आकडा पार करत 77 जागांवर आघाडी घेतली आहे, तर काँग्रेस 48 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे भाजपला स्पष्ट जनमत मिळताना दिसत आहे. बद्रुदीन अजमल यांचाही करिश्मा तिथे चालला नाही. तामिळनाडूतील जनतेने द्रमुकच्या पदरात मते टाकत स्पष्ट बहुमताचा कौल दिला आहे. द्रमुक 141 जागी आघाडीवर आहे, तर सत्ताधारी अण्णाद्रमुक 89 जागांवर आघाडीवर आहे. कमल हासन विजयाच्या मार्गावर आहेत. मुख्यमंत्री पनीरसेल्वम आणि उपमुख्यमंत्री पलानीस्वामी आघाडीवर होते. 30 सदस्यसंख्या असलेल्या पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीचे निकाल दुपारनंतरही स्पष्ट झालेले नाहीत.

पुद्दुचेरीत कुणाची सत्ता येणार याचा सस्पेन्स कायम असून, भाजपने दहा जागांवर विजय मिळविला आहे. काँग्रेस चार जागांवर आघाडीवर आहे. भाजप बहुमतापासून फक्त सहा जागांनी पिछाडीवर आहे. पुदुचेरीतील चित्र स्पष्ट होण्यासाठी मध्यरात्र होण्याची शक्यता आहे. द्रमुक 139 जागी आघाडीवर आहे. तामिळनाडूत बहुमताचा आकडा 118 इतका आहे. दुसरीकडे केरळमध्ये मुख्यमंत्री पिनराई विजयन नवा इतिहास नोंदवला आहे. विजयन यांना सलग दुसर्‍यांदा सत्तेची संधी मतदारांनी दिली आहे. विजयन यांच्या नेतृत्वाखालील एलडीएफ 92 जागांवर आघाडीवर आहे. आसाममध्ये भाजपने आपली सत्ता राखली आहे. सध्या भाजपाने 77 जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस 48 जागांवर आघाडीवर आहे. केरळात चार दशकांची परंपरा मतदारांनी काढली मोडीत.

▶️40 वर्षानंतर इतिहासाची पुनरावृत्ती
केरळात पहिल्यांदाच सत्तांतराचा इतिहास बाजूला ठेवत एलडीएफकडे दुसर्‍यांदा राज्याची सत्ता सोपवली आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पसंती देत मतदारांनी भरघोस मतदान टाकल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. मागील चार दशकांपासून केरळमध्ये प्रत्येक पाच वर्षाला सत्तांतर होत आले आहे. चाळीस वर्षानंतर पहिल्यांदाच सलग दुसर्‍या विजय मिळवण्यात सत्ताधार्‍यांना यश आले आहे.

▶️जल्लोषाची गांभीर्याने दखल
कोरोना परिस्थिती असताना गर्दी करुन कार्यकर्त्यांकडून होत असलेल्या जल्लोषाची निवडणूक आयोगाने गंभीर दाखल घेतली आहे. निवडणूक आयोगाने राज्यांच्या सचिवांना पत्र पाठवले असून, निवडणूक मिरवणुकींवर बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच अशा घटना घडणार्‍या क्षेत्रातील जबाबदार पोलिस अधिकारी आणि इतर अधिकार्‍यांना तत्काळ निलंबित करून त्यांच्याविरुद्ध गुन्हेगारी आणि शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, असे निर्देश दिले आहेत.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

50 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!