Google Ad
Editor Choice Education

Delhi : NEET PG Exam Postponed … नीट पीजी परीक्षा 4 महिन्यांसाठी लांबणीवर … केंद्र सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोना विषाणू संसंर्गाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. पीएमओ ऑफिसच्या माहितीनुसार पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांची उपलब्धता वाढवण्यासाठी महत्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये NEET-PG परीक्षा 4 महिने लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोना विषाणू संसर्गामुळे ही परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली होती. ही परीक्षा देशातील 6,102 सरकारी, खासगी, अभिमत आणि केंद्रीय विद्यापीठांमधील पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशांसाठी आयोजित केली जाते. केंद्र सरकारनं कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध व्हावेत म्हणून परीक्षा लांबणीवर टाकल्या आहेत.
एमएमबीएसच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना मोबाईल फोनद्वारे आरोग्य विषयक कन्सलटेशन करणे. सौम्य लक्षणं असणाऱ्या कोरोना रुग्णांच्या प्रकृतीची काळजी घेणं. प्राध्यापकांच्या निगराणीखाली त्यांनी ही कामं करायची आहेत. बीएसी आणि जीएनम पात्र असणाऱ्या नर्सेसना पूर्ण वेळ कोविड ड्यूटी करावी लागणार आहे.

Google Ad

▶️नीट परीक्षा कोण देतं?
NEET PG 2021 परीक्षा मेडिकलमध्ये मास्टर्स करण्याची इच्छा असेल, अशा विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाते. या परीक्षेत MBBS आणि BDS चे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. मात्र,त्या विद्यार्थ्यांनी इटर्नशिप पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र त्यांच्याकडे असणं आवश्यक आहे. MBBS हा पदवी आणि MD पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

2 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!