Google Ad
Editor Choice Pune

औंध – वाकड सांगवी रस्त्यावरील पुलाशेजारी नव्याने बांधण्यात येणाऱ्या पुलामुळे … वाहतुकीत होणार बदल!

महाराष्ट्र 14 न्यूज : पुणे शहरातील चतुःश्रृंगी वाहतुक विभागाचे हद्दीत औंध-वाकड-सांगवी ( डी-मार्ट जवळ ) रस्त्यावरील पुलाशेजारील नव्याने पुल बांधण्याचे काम करण्यात येणार आहे . त्यासाठी अस्तित्वात असलेल्या पुलावरील वाहतुक बंद करुन सदर कामाकरिता वाहतुकीमध्ये दि .०७ ऑक्टोबर २०२० पासुन दि . ०६ जानेवारी २०२१ पर्यंत पुढील आदेशापर्यंत प्रायोगिक तत्वावर वाहतुकीत बदल करणे गरजेचे असल्याने डॉ . संजय शिंदे , अप्पर पोलीस आयुक्त , वाहतुक . पुणे शहर , यांनी सदर रस्त्यावरील वाहतुक काम पुर्ण होईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात वाहतुक वळविण्यात येणार आहे , असे कळविले आहे.

औंध वाकड सांगवी रस्त्यावरील जुना पुलाशेजारील ( डी-मार्ट जवळ ) नव्याने पुल बांधण्याचे काम दि .०७ ऑक्टोबर २०२० पासुन ते दि . ०६ जानेवारी २०२१ पर्यंत करण्यात येणार आहे . तरी सदर ठिकाणी वाहतुक कोंडी होवु नये व वाहतुक सुरळित चालण्यासाठी सदरचा औंध सांगवी पुल बंद करण्यात येणार असुन त्यासाठी खालील मार्गाने वाहतूक डायव्हर्शन करण्यात येत आहे .

Google Ad


असा होणार वाहतुकीत बदल :-
१. सांगवी वाकडकडे जाणारी वाहतुक भाले चौक – परिहार चौक – ऋषी मल्होत्रा चौक -राजीवगांधी ब्रीज मार्गे इच्छित स्थळी जाईल .
२. सांगवी वाकडकडे जाणारी वाहतुक भाले चौक नागरस रोड – आंबेडकर सेतु मार्गे इच्छित स्थळी जाईल .

तरी वरील प्रमाणे वाहतुक बदलाबाबत वाहतुक पोलीसांना सहकार्य करावे असे आवाहन पुणे शहर वाहतुक शाखा यांचे मार्फतीने करण्यात येत आहे”असे ( डॉ.संजय शिंदे ) 310 अप्पर पोलीस आयुक्त , वाहतूक पुणे शहर यांनी कळविले आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!