Google Ad
Editor Choice Front Maharashtra

बाळाला डाळ भरवण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का ?

महाराष्ट्र 14 न्यूज : सर्वच डाळी खूपच पौष्टिक आणि स्वादिष्ट असतात. डाळींमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळून येते. तसेच डाळींमध्ये डायट्री फायबर देखील प्रचंड प्रमाणात असते. मुलांच्या विकासासाठी डाळी लाभदायक मानल्या जातात कारण त्या आर्यन, फॉस्फरस, फॉलिक अॅसिड, पोटॅशियम यासारख्या खनिज पदार्थांनी युक्त असतात. डाळीमध्ये प्रथिने खूप प्रमाणात असतात आणि त्याचा स्नायूंच्या विकासासाठी फायदा होतो. डाळीचे फोडणी घालून वरण केल्यास ते भात किंवा चपाती सोबत खाता येते आणि त्यास उग्र वास राहात नाही.

९ ते ११ वर्षांच्या बाळाला डाळ भरवण्यास तुम्ही सुरुवात करु शकता. काही पालक बाळाला वयाच्या ६ महिन्यांनंतर डाळ खाऊ घालण्यास सुरुवात करतात जे की काही प्रकरणात चुकीचं ठरु शकतं. कारण या वयात बाळ डाळीत असलेले प्रथिने आणि फायबर पचवण्यास सक्षम नसते. त्यामुळे हेच योग्य ठरेल की बाळाला ९ महिन्यांचा झाल्यानंतरच डाळ भरवण्यास सुरुवात करावी. कारण शरीराला फक्त पोषण तत्व मिळणंच आवश्यक नाही तर ते बाळाला पचणं आणि त्रासदायक न होणंही गरजेचं असतं.

Google Ad

प्रेग्नेंसी दरम्यान महिलांना डाळींचे जास्त प्रमाणात सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. कारण डाळींमध्ये फोलेट मोठ्या प्रमाणात असते जे की गर्भातील बाळाच्या नसांसाठी खूपच उपयुक्त ठरते. डिलिव्हरी नंतरही बाळाच्या विकासासाठी फॉलिक अॅसिड गरजेचं असतं. फॉलिक अॅसिड हे शरीरात नवीन पेशी निर्माण करण्यास आणि शरीराच्या विविध अवयवांचा अंतर्गत विकास करण्यास मदत करते.जर लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तर त्याचा कोणत्याही साथीच्या रोगांपासून आणि धोकादायक संक्रमणांपासून सहज बचाव होतो आणि आरोग्य निरोगी राहते. डाळींमध्ये झिंक देखील असते जे रोगप्रतिकारक शक्तीसाठी लाभदायक असते. सध्या तर करोना संक्रमणाचं सावट संपूर्ण जगावर घोंघावतं आहे त्यात पावसाळा सुरु झाल्याने पालकांनी मुलांच्या आरोग्याबाबत अधिक सतर्क राहणं गरजेचं आहे. डाळ हा असा पदार्थ आहे जो मुलांना रोज दिला तरी त्याने फायदेच फायदे होतील.

डाळींमध्ये मोठ्या प्रमाणात अद्राव्य फायबर असते जे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आपल्याला चार हात दूर ठेवते. डाळ खाल्ल्याने शरीरात विषारी पदार्थांची निर्मिती होत नाही. यामुळे पचनक्रिया देखील सुधारते. तसेच अनेक पचनक्रियांसबंधित समस्या जसं की इरिटेबल बाऊल सिंड्रोम आणि डाइवर्टिक्‍युलोसिसपासून बचाव होतो. डाळीत व्हिटॅमिन ब आणि लोह देखील असतं. लोह म्हणजेच आर्यन शरीरातील लाल रक्तपेशींची संख्या वाढवतं आणि स्नायू, उत्तिका आणि इतर अवयवांना मुबलक प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा करतं. डाळीतील फायबर आणि इतर आवश्यक पोषक तत्व बाळाचं ह्रदय निरोगी ठेवतात.

डाळींचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध असतात त्यामुळे त्यापैकी कोणती डाळ चांगली आणि कोणती डाळ बाळाला खाऊ घालावी हे सांगणं कठीणच आहे. कोणतीही प्रक्रिया न केलेल्या डाळीचं सूप किंवा प्युरी बाळासाठी चांगली असते कारण त्यात फायबर कमी असतं. मोठ्या मुलांसाठी हिरव्या रंगाच्या डाळी लाभदायक असतात. बाळाला मसूर डाळ खाऊ घालू नका कारण यामुळे त्याला गॅस होऊ शकतो. तसेच डाळ शिजवण्याआधी ती रात्रभर भिजवण्याची गरज नाही. तीन शिट्ट्यांमध्येच डाळ चांगली शिजून बारीक होईल. ती शिजलेली डाळ चमच्याने घोटून पातळ करुन तुम्ही बाळाला भरवू शकता. अशी पातळ केलेली डाळ बाळाला पचवण्यास हलकी असते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

12 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!