Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

कोरोनाच्या कठीण काळात नगरसेवक ‘राजू बनसोडे’ यांचा दापोडी परिसरातील रुग्णांना मोफत रुग्णवाहिकेच्या रूपाने मदतीचा हात!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३मे) : सध्या कोरोनाच्या कठीण परिस्थितीमध्ये रुग्णांना तात्काळ आरोग्य सुविधा मिळण्याची गरज असते. रुग्ण आरोग्य सुविधेपर्यंत पोहोचण्यासाठी रुग्णवाहिकेची अत्यंत आवश्यकता असते. परिसरातील नागरिकांची हीच गरज ओळखून नगरसेवक ‘राजू बनसोडे’ यांनी अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी ‘पार्थ पवार फाऊंडेशन’च्या माध्यमातून यांच्या सौजन्याने मोफत रूग्णवाहिका सेवा देण्याचा मनोदय केला. आज या रुग्णवाहिकेचे उद्घाटन व लोकार्पन सोहळा अगदी साध्या पद्धतीने दापोडीतील सी एम ई गेट जवळील त्यांच्या कार्यालया समोर संजोग वाघिरे पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिंपरी चिंचवड) व विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

त्याप्रसंगी नगरसेविका स्वाती माई काटे, युवासेना विभागप्रमुख निलेश हाके, शहरउपाध्यक्ष शेखर काटे, स्वीकृत सदस्य संजय कणसे, कार्याध्यक्ष जन्नतबी सय्यद, उपाध्यक्ष सुवर्णा काळभोर,सौ.प्राजक्ता कांबळे,अजय जाधव,मनोज वाखरे,रवी कांबळे,उपाध्यक्ष फमिदा शेख,सदाशिव रसाळ,गोरख ब्राह्मणे,सद्गुरु काटे सोपान काटे,संभाजी काटे, जालिंदर थोरात,भाऊसाहेब मुकुटमल,जाफर शेख,मधुकर सातपुते,तानाजी डोईफोडे,सचिन शिंदे,अॅलेक्स दास,पाॅल नायर,दिलराज आण्णा हे याप्रसंगी उपस्थित होते.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

7 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!