Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

कोरोना काळात गरीब रुग्णांना तातडीने उपचार मिळण्याकरिता राहटणीत कोविड सेंटर सुरू करा … नगरसेवक ‘चंद्रकांत नखाते’ यांनी केली मागणी

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या कोरोनाच्या संकट काळात प्रभाग क्रमांक २७ चे नगरसेवक चंद्रकांत नखाते यांनी पिंपरी चिंचवड आयुक्तांना कोरोनाच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना भेडसावत असलेल्या समस्या बाबत निवेदन दिले आहे, त्यात त्यांनी म्हटले आहे की, या भागामध्ये सर्व सामान्य नागरिक , गरीब हातावरचे पोट असणारे मजूर तसेच प्रत्येक कॉलोनीमध्ये १० ते १२ कोविड -१९ रुग्ण व प्रभागामध्ये असलेल्या सोसायट्या यामध्ये कोविड -१९ च्या बऱ्याच केसेस आढळल्या आहेत .

या परिसरातील रुग्णांना उपचार घेण्याकरिता वाय.सी.एम.एच , जिजामाता हॉस्पिटल , ऑटोक्लस्टर , जम्बो कोविड़ सेंटर अशा लांबच्या ठिकाणी जाण्याकरिता अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत असून , सदरच्या कोविड -१९ च्या उपचाराकरिता आमच्या प्रभाग क्रमांक -२७ मध्ये पिंपरी – चिंचवड महानगरपालिका शाळा क्रमांक -५५ ची मोठी इमारत असून , त्या शाळेमध्ये ५० बेडचे कोविड -१९ सेंटर चालू करून त्यामध्ये ऑक्सिजन आणि व्हेंटीलेटर ची सुद्धा व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी नगरसेवक चंद्रकांत नखाते यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

146 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!