Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

संदिपदादा गायकवाड यांनी दापोडीतील ३५० मुस्लिम कुटुंबाना दिला मदतीचा हात … रमजान ईद निमित्त शिरखुर्मा किटचे केले वाटप!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : इस्लामिक कॅलेंडरमध्ये दोनदा ईद साजरी केली जाते. ईद उल फितर आणि ईद उल अझा. इस्लाममध्ये रमजान ईद हा खूप आनंदी दिवस मानला जातो. ईदच्या दिवशी लोक अल्लाहला त्यांनी केलेल्या पापाची क्षमा मागतात, तर ते आपल्या आप्तेष्ठयांसाठी देखील अल्लाह ला प्रार्थना करतात. सध्या कोरोनाच्या संकट काळात गरीब लोकांना दोन वेळेचे अन्न महाग झाले आहे. अशा या संकट प्रसंगी दापोडी येथील सामाजिक कार्यकर्ते ‘संदीप दादा गायकवाड’ यांच्या वतीने आमदार आण्णा बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील ३५० गरीब गरजू मुस्लिम कुटुंबाना शिरखुरमा किट वाटप करण्यात आले.

तसेच आजपर्यंत दापोडी परिसरातील ३००० कुटुंबाना अन्नधान्याच्या किटचे वाटपही त्यांच्या वतीने करण्यात आले आहे. संदीप गायकवाड यांचा दापोडीतील गोरगरिबांना नेहमीच मदतीचा हात असतो, गरिबांच्या मदतीला धावून जाणे हा त्यांचा स्वभाव आहे. ईद उल फितरचा दिवस रमजानच्या पवित्र महिन्यानंतर येतो जेव्हा संपूर्ण लोक संपूर्ण महिन्यात रमजान उपवासानंतर अल्लाहला प्रार्थना करतात.

Google Ad

हा दिवस आपल्या परिसरातील गरीब मुस्लिम कुटुंबातील घरातही साजरा झाला पाहिजे ही संदीपदादा गायकवाड यांची भावना आहे. त्यामुळे त्यांनी या सणाचे औचित्य साधून या गरजूंना मदतीचा हात दिला आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या जन्नतबी सय्यद आणि बचतगटातील महिला भगिनी उपस्थित होत्या. यावेळी संदीप गायकवाड यांनी मुस्लिम बांधवांना रमझान ईदच्या शुभेच्छा दिल्या.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

32 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!