Google Ad
Editor Choice Maharashtra

जिद्द, मेहनत,कष्टाच्या जोरावर परिस्थितीवर मात करणारे आदिवासी वस्तीतील, ‘अनमोल रत्न’… रोहिदास बो-हाडे

महाराष्ट्र 14 न्यूज : जिद्द, मेहनत आणि विश्वासाच्या जोरावर, परिस्थितीवर मात करणारे आदिवासी वस्तीवरील एक अनमोल रत्न म्हणजे रोहिदास बोऱ्हाडे होय. रविवारी आदिवासी दिनानिमित्त पिंपळे गुरव येथील सृष्टी चौक येथे नगरसेविका उषा मुंढे यांनी सन्मानित केल्यानंतर घेतलेला आढावा.

जुन्नर तालुक्यातील अतिशय दुर्गम भागातील सह्याद्री पर्वताच्या कुशीत पाचशे ते सहाशे लोकवस्ती असलेल्या देवळे या लहानश्या वस्तीत रोहिदास धोंडू बोऱ्हाडे यांचा जन्म झाला. घरची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट होती. त्यात घरात कोणीही सुशिक्षित नाही. त्यामुळे आपल्याला करावे लागत असलेले काबाड कष्ट आपल्या मुलांना करायची वेळ येऊ नये. यासाठी बोऱ्हाडे यांच्या वडिलांनी डोक्यावर लाकडाचे ओझे वाहून पोटाला चिमटा देत दोन पैसे जमा केले. आणि मुलगा रोहिदास याला शिक्षण दिले.

Google Ad

वडिलांनी आपल्या डोळ्यासमोर गुडघाभर चिखलात, फाटक्या कपड्यावर उभे आयुष्य काढताना रोहिदास यांनी डोळ्यांनी पाहिले आहे. त्यामुळे वडिलांच्या कष्टाचे चीज केल्याशिवाय मी शांत बसणार नसल्याची शपथच जणू रोहिदास बोऱ्हाडे यांनी घेतली होती. आदिवासी वस्तीवरील बोऱ्हाडे यांनी परिस्थितीचा सामना करत उच्च शिक्षण घेतले. आज ते पोलीस दलात कार्यरत आहेत. एक गरीब घरचा, आदिवासी मुलगा, परिस्थितीशी दोन हात करून पोलीस झाला. याचा आनंद इतरांना झाल्याशिवाय राहणार नाही.

रोहिदास बोऱ्हाडे पोलीस दलात भरती झाल्यानंतर ते कधीच भूतकाळ विसरले नाही. आपण अनुभवलेली परिस्थिती इतरांना पहावयास मिळू नये यासाठी बोऱ्हाडे यांच्यातील वर्दीतील माणुसकी अजूनही जिवंत आहे. विद्यार्थाना मदत करणे, गरजूंना शालेय वस्तू व साहित्य देणे, मुलांना खाऊ वाटप करणे यासारखे समाज उपयोगी उपक्रम ते नित्याने करत आहेत. त्यामुळे बोराडे यांच्या जिद्दीची आणि कर्तुत्वाची दखल घेत आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त घेतलेली विशेष दखल होय.

 

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!