Google Ad
Editor Choice Health & Fitness india Maharashtra

करोनारुग्ण २० लाखांच्या पुढे, मोदी सरकार बेपत्ता: राहुल गांधी काय म्हणाले बघा

महाराष्ट्र 14 न्यूज : देशातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीवरून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर पुन्हा टीका केली आहे. गुरुवारी देशात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या २० लाखांच्या पलीकडे गेली. त्यासंदर्भात राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा ट्विट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला. आतापर्यंत २० लाखांचा टप्पा ओलांडला गेला आहे, मोदी सरकार बेपत्ता झाले आहे, असे राहुल गांधींनी ट्विटमध्ये म्हटले आहे. १७ जुलै रोजी जेव्हा देशात कोरोना रूग्णसंख्येने १० लाखांचा टप्पा ओलांडला होता, तेव्हाही राहुल गांधी यांनी असेच ट्विट करत सरकारवर निशाणा साधला होता.

१७ ऑगस्टच्या आपल्या ट्विटमध्ये १० ऑगस्टपर्यंत देशातील कोरोना रूग्णांची संख्या २० लाखांवर पोहचेल असे राहुल गांधींनी म्हटले होते. सरकारने हा संसर्ग रोखण्यासाठी ठोस आणि कठोर पावले उचलली पाहिजेत, अशी मागणी त्यांनी त्यावेळी केली होती. म्हणूनच आजच्या ट्विटमध्ये त्यांनी आपले ते जुने ट्विट जोडले आहे. काल रात्री म्हणजेच ६ ऑगस्ट रोजी करोनाच्या रुग्णसंख्येने देशात २० लाखांचा आकडा पार केला आहे. याचा उल्लेख करत आता रुग्णसंख्येने २० लाखांचा टप्पा ओलांडला आहे आणि मोदी सरकार बेपत्ता आहे, असे म्हटले आहे.

Google Ad

देशभरातील कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या २० लाखांच्या पुढे गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशातील कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांची संख्या १३,२८,३३६ वर पोचली आहे आणि त्या बरोबर रुग्ण बरे होण्याचा दर देखील ६७.६२ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. त्याचबरोबर देशाची राजधानी दिल्लीमध्ये करोना संसर्गाचा आकडा १ लाख ४० हजारांवर पोहोचला आहे.

 

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!