Google Ad
Editor Choice Education india

Delhi : १ सप्टेंबर नंतर राज्याच्या अधिकारात टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचा केंद्राचा विचार?

महाराष्ट्र 14 न्यूज : करोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा आणि शैक्षणिक संस्था पुन्हा एकदा सुरु करण्यासाठी केंद्र सरकारने योजना आखली आहे . १ सप्टेंबर ते १४ सप्टेंबरदरम्यान टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्याचा केंद्राचा विचार आहे . ३१ ऑगस्ट रोजी लॉकडाउन संपल्यानंतर केंद्र सरकारकडून निबंध शिथील करत नव्या गाइडलाइन्स प्रसिद्द केल्या जातील . त्यावेळी ही घोषणा केली जाण्याची शक्यता आहे . इकॉनॉमिक टाइम्सने यासंबंधी वृत्त दिलं आहे.करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर केंद्र सरकारकडून लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आणि शाळा बंद झाल्या .

Google Ad

२३ मार्चपासून संपूर्ण देशभरातील शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद आहेत . तेव्हापासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यावर भर दिला जात आहे . आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या नेतृत्त्वाखाली पार पडलेल्या बैठकीत शाळा सुरु करण्याच्या योजनेवर चर्चा झाली . ३१ ऑगस्ट रोजी जाहीर होणाऱ्या अनलॉकच्या नव्या गाइडलाइन्समध्ये याचा समावेश असण्याची शक्यता आहे . यावेळी राज्यांना शाळा सुरु करण्यासंबंधी सांगितलं जाऊ शकतं . मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत कसं आणि कधी आणायचं हा निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारांकडे असणार आहे .

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

12 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!