Google Ad
Editor Choice Health & Fitness Maharashtra

दोन पाय-या चढल्यावरही दम लागत असल्यास करा ‘हे’ उपाय !

महाराष्ट्र 14 न्यूज : पाय-या चढत असताना तिस-या ते चौथ्या मजल्यावर जाईपर्यंत धाप लागणं नवीन नाही. ही समस्या सर्रास आपल्या सर्वच स्त्री-पुरुषांमध्ये दिसून येते. पण त्यातही अगदी पाचव्या मजल्यावर जाईपर्यंतही दम लागला नाही तर तुमचं शरीर एकदम सुदृढ आहे असं तुम्ही समजू शकता. फिटनेसबद्दल विचार केला तर पाय-या चढताना आणि उतरताना आपल्या शरीरातील अधिक कॅलरीज खर्च होतात आणि शरीरावरील अतिरिक्त चरीब विरघळून जाते. या घटनाक्रमात आपल्याला अधिक उर्जेची गरज भासते आणि आपण थकून जातो. पण हेच आपल्याला फक्त दोन मजल्यांच्या पाय-या चढल्यावरही होत असेल तर मात्र तुमचे शरीर कमजोर आहे.

दोन मजल्यांच्या पाय-या चढून जर तुम्हाला दम लागत असेल तर याचा अर्थ तुमचे ह्रदय निरोगी नाही. त्यामुळे हे आपले ह्रदय अजून कमजोर होण्यापासून वाचवायचं असेल तर मात्र तुम्हाला अधिक काळजी घ्यावी लागेल. ही स्थिती शरीरात निर्माण होणा-या आजारांचे प्राथमिक संकेत देखील असू शकतात. कधी कधी ही समस्या आपण अधिक आळशी (lazy lifestyel) आयुष्य जगत असल्यामुळे देखील होऊ शकते.काही लोकांना पाय-या चढल्यानंतर डोकं जड होणं, चक्कर येणं, डोळ्यांपुढे अंधारी येणे अशा समस्या निर्माण होतात. जर तुम्हालाही अशा समस्यांचा वारंवार अनुभव येत असेल तर मात्र एकदा डॉक्टरची भेट जरुर घ्यावी. कारण ही स्थिती कोणत्यातरी गंभीर आजाराची सुरुवात असू शकते.

Google Ad

सोबतच आपल्या डाएटची पूर्ण काळजी घ्या. या गोष्टी जाणून घ्या की तुम्ही घेत असलेल्या आहारातून तुम्हाला पूर्ण पोषण मिळतंय का? कारण शरीरला मुबलक प्रमाणात पोषणयुक्त पदार्थ मिळाले नाहीत तर मात्र शरीर कमजोर पडतं आणि अनेक आजार शरीराला विळखा घालतात. त्यामुळेही थकवा आणि दम लागणे अशा समस्या होतात.पण हो, त्याआधी तुम्हाला हे देखील पडताळावे लागेल की लॉकडाऊन आणि करोना संक्रमणामुळे बरेच दिवस आपण सर्वजण घरी आहोत त्यामुळे शारीरिक हालचालही कमी होत आहे. अशी शारीरिक हालचाल कमी नसावी. अन्यथा याच घराच्या पाय-यांवर चढउतार करुनही तुम्ही स्वत:ला फिट ठेऊ शकता. योग करुन, घराच्या अंगणात, छतावर काही वेळ चालू शकता आणि स्वत:चं सुस्त आणि लठ्ठ झालेलं शरीर आरोग्यदायी ठेऊ शकता.

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

19 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement