Google Ad
Editor Choice

नवी सांगवी आणि पिंपळे गुरव मधील नागरिकांना येथे मिळणार मोफत युनिव्हर्सल पास ( SMART CARD ) आणि कोव्हीड लसीकरण प्रमाणपत्र

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८ फेब्रुवारी ) : आमदार ‘लक्ष्मणभाऊ जगताप’ यांच्या संकल्पेनेतुन आणि माजी नगरसेवक ‘शंकरशेठ जगताप’ यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी सांगवी -काळेवाडी मंडल यांच्या वतीने मोफत युनिव्हर्सल पास ( SMART CARD ) आणि कोव्हीड लसीकरण प्रमाणपत्र तसेच विविध प्रकारच्या योजनांचे प्रमाणपत्र सांगवी-पिंपळे गुरव भागातील नागरिकांना मोफत देण्यात येणार आहे.

▶️या योजनांचे मिळणार कार्ड

Google Ad

*युनिव्हर्सल कोविड पास
*मोफत स्मार्ट आधार कार्ड
*स्मार्ट ई – श्रम कार्ड
*स्मार्ट पॅन कार्ड
*स्मार्ट उद्योग आधार कार्ड
*स्मार्ट मतदान कार्ड

कोरोनो प्रतिबंध लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना सार्वजिनक वाहतुकीने प्रवास करणेसाठी जसे रेल्वे , बस , विमान आणि शासकीय व निमशासकीय कार्यालय , खाजगी शॉपींग मॉल , सिनेमागृह व इतर ठिकाणी प्रवेश मिळणेसाठी युनिव्हर्सल पास ( SMART CARD ) दाखविणे आवश्यक आहे.

पात्रता अर्जदाराने लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर किमान १४ दिवसाचा कालावधी लोटलेला आवश्यक कागदपत्रे व माहिती
१ ) मतदार यादीत नाव असणे आवश्यक
२ ) पासपोर्ट साईज फोटो
३ ) लस घेताना नोंदणी केलेला मोबाईल नंबर

▶️येथे मिळणार पास आणि प्रमाणपत्र :-
दिनांक ०८ फेब्रुवारी २०२२ पासून
वेळ – सकाळी १० ते सायं . ०५ स्थळ- जनसंपर्क कार्यालय चंद्ररंग आर्केड , कृष्णा चौक , नवी सांगवी , पुणे
या योजनेचा मोफत युनिव्हर्सल पास ( SMART CARD ) आणि कोव्हीड लसीकरण प्रमाणपत्र घेण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टी सांगवी काळेवाडी मंडल यांच्या वतीने परिसरातील नागरिकांना केलेआहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!