Google Ad
Editor Choice

अहिल्यादेवी होळकर सेवा संघातर्फे पोलीस निरीक्षक अलका सरग यांचा सन्मान

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ फेब्रुवारी) : अहिल्यादेवी स्मारक, जुनी सांगवी येथे रविवारी सकाळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पोलीस निरीक्षक अलका हराळे (सरग) यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.

यावेळी अहिल्यादेवी सेवा संघ व सर्व समाज बांधव यांच्या वतीने अलकाताई यांची मुंबई येथे पोलिस निरीक्षकपदी (रेल्वे)पदोन्नती झाल्याबद्दल शाल, श्रीफळ प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. परिसरातील समाजबांधव यांच्याकडून झालेला झालेला सन्मान हा अत्यंत जवळचा व कौटुंबिक असल्याची भावना अलका सरग-हराळे यांनी व्यक्त केली .

Google Ad

तसेच समाजातील युवतींनी पुढे येऊन स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होऊन स्वतःचे स्थान निर्माण करावे अशी अशा त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान याप्रसंगी मोहन पाटील सर यांना वाढदिवसानिमित्त सर्व बांधवांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी भारतरत्न गानसम्राज्ञी लतादीदींना संघाच्या वतीने सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी संघाचे अध्यक्ष अजय दूधभाते, बाबासाहेब चितळकर ,सूर्यकांत गोफणे ,मनोजकुमार मारकड, सुधाकर सूर्यवंशी ,मारुती भालेकर ,मोहन पाटील ,छगन वाघमोडे, सतीश कोकरे ,संतोष भुरे ,संतोष मदने ,नवनाथ भिडे , कु. प्रतिक्षा कोकरे, कु. ऋतुजा भिडे,राजाभाऊ धायगुडे ,संपत भिटे , वर्षाताई मदने , महादेव मासाळ, अक्षय तिकडे, कल्याण बोकडे, काळे, लंबाते सर वाघमारे, हेमंत पाडुळे, अंबादास पडळकर , अरविंद काळे , नामदेव मारकड , विवेक लबडे, नारायण पितळे यांच्यासह परिसरातील समाज बांधव उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!