Google Ad
Editor Choice

सांगवीकरांची धाकधूक वाढली … पिंपरी चिंचवड मनपाच्या प्रभाग क्रमांक ४६ मध्ये इच्छुकांची ‘भाऊगर्दी’ …

महाराष्ट्र 14 न्यूज (दि.०८ फेब्रुवारी) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूकीचे बिगुल वाजू लागले … तसतशी निवडणूक लढविण्यास इच्छुकांची चाचपणी सुरू झाली. आरक्षण जाहीर होण्यापूर्वीच शहरातील इच्छुक उमेदवारांची धडधड वाढली असून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले इच्छुक व विद्यमान हे आरक्षण कसे होतेय याची वाट पाहू लागले आहेत.

Google Ad

महानगरपालिका निवडणुकीत सर्वात मोठा असेलला प्रभाग क्रमांक ४६ हा ४६९७९ लोकसंख्या असलेला विध्यमान महापौर माई ढोरे यांचा हा प्रभागही याला अपवाद नाही. याच प्रभागात २०१७ च्या निवडणुकीत नवी सांगवी चा काही भाग जोडण्यात आला. या भागातील नागरिकांच्या मते म्हणावीत अशी कामे आमच्या भागात झाली नाहीत, आणि सांगवीकर उमेदवार तर हा आपल्या प्रभागाचाच एक भाग आहे, हे या पाच वर्षात पूर्णपणे विसरूनच गेले आणि आमच्या भागातील समस्या सांगण्याकरीता आम्हाला सांगवीत जावे लागत होते. परंतु असे असले तरी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या माध्यमातून या भागात थोडीफार कामे झाली,आणि नागरिक ही आपल्या समस्या सोडविण्यासाठी त्यांच्याकडे जात होते, आणि भाऊ ही आमची कामे करतात असे येथील नागरिक सांगतात.

या २०२२ च्या निवडणूकित यावेळीही नवीनच झालेल्या प्रभाग रचनेत प्रभाग ४६ सांगवीस नवी सांगवीचा आदर्श नगर, शितोळे मळा व इतरचा काही भाग जोडण्यात आला आहे. मागील वेळी नागरिकांची कुचंबणा झाली, याच गोष्टीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आता नवी सांगवीतला उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय नवी सांगवीकरांनी घेतला आहे.

याकरीता या भागातील नागरिकांनी सांगवी-नवी सांगवी ची ओळख असणारे भाजपचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते ‘सुरेश तात्याबा शिंदे’ यांच्या नावाची शिफारस आमदार लक्ष्मण जगताप यांच्याकडे केली आहे, आणि आपले गाऱ्हाणं मांडले आहे. त्यामुळे सांगवी प्रभाग ४६ मधील उमेदवारांची धाकधूक वाढली हे मात्र नक्की …

आता आरक्षण कसे होते? कोणाचा पत्ता कट होणार व कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!