Google Ad
Editor Choice Front india Maharashtra

युद्धासाठी सज्ज; चीनला भारतीय नौदलाचा स्पष्ट संदेश, सूत्रांची माहिती !

महाराष्ट्र 14 न्यूज : पूर्व लडाखच्या सीमेवर तणाव निर्माण झाल्यानंतर हिंद महासागरात सर्व आघाडीच्या युद्धनौका आणि पाणबुड्या आक्रमकपणे तैनात करून भारतीय नौदलाने बीजिंगला एक स्पष्ट संदेश दिला आहे. चीनला भारताची आक्रमकता समजून घेत आहे, असं सुरक्षा यंत्रणेतील वरिष्ठ सूत्रांनी सांगितलं. लडाखच्या गलवान खोऱ्यात १५ जूनला भारत-चिनी सैनिकांमध्ये झालेल्या रक्तरंजित संघर्षानंतर सीमेवरील तणाव आणखी वाढला. या पार्श्वभूमीवर हिंद महासागरात आपल्या प्रमुख युद्धनौका आणि पाणबुड्या तैनात करत भारतीय नौदलाने आपला हेतू स्पष्ट केला आहे.

लष्कर, हवाई दल आणि नौदलासह राजनैतिक आणि आर्थिक मार्गांद्वारे बहुआयामी दृष्टीकोन स्वीकारून पूर्व लडाखमधील चीनची आक्रमण मान्य नसल्याचे स्पष्ट संकेत भारताने चीनला दिले आहेत, असं सूत्रांनी सांगितलं. परिस्थितीशी सामना करण्यासाठी आणि चीनला भारताच्या स्पष्ट संदेशाबद्दल जागरूक करण्यासाठी सैन्याच्या तिन्ही दालांचे प्रमुख जवळपास रोज चर्चा करत आहेत. सीमेवरील वादावर सैन्याच्या प्रत्युत्तरावर तिन्ही दल एकत्रितपणे काम करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. मालाक्काची सामुद्रधुनी आणि आसपासचा परिसर चीनसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळे भारतीय नौदलाने हिंद महासागर क्षेत्रात युद्धनौका आणि पाणबुड्यांची तैनात करून चीनवर दबाव वाढवला आहे.

Google Ad

चीन भारताचा संदेश समजत आहे. चीनने भारताच्या तैनातीला प्रतिसाद दिला आहे का? याविषयीही सूत्रांनी माहिती दिली. हिंद महासागरात चिनी जहाजांच्या हालचालींमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. अमेरिकेच्या तीव्र विरोधानंतर पीएलए नेव्हीने दक्षिण चीन समुद्रात अत्यधिक संसाधनं ठेवली आहेत. जहाजांच्या वाहतुकीचे स्वातंत्र्य प्रदर्शित करण्यासाठी अमेरिकेने दक्षिण चीन समुद्रात अनेक जहाजं पाठविली आहेत. तसंच चीनशी प्रादेशिक वाद असणार्‍या देशांना अमेरिका पाठिंबा देत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

11 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!