Google Ad
Editor Choice Health & Fitness Maharashtra

धक्कादायक… सेल्फी घेतलेला क्रिकटपटूचं निघाला करोना पॉझिटीव्ह

महाराष्ट्र 14 न्यूज : क्रिकेटपटूंचे चाहते आपल्याकडे भरपूर असतात. एखादा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू दिसला की त्याची सही घ्या, त्याच्याबरोबर सेल्फी काढा, असे चाहते करत असतात. अशाच एका चाहत्याने आपल्या आवडत्या क्रिकेटपटूला पाहिले आणि त्याच्याबरोबर सेल्फी घेण्याचा मोह त्याला आवरला नाही. पण त्यानंतर या चाहत्याला क्रिकेटपटू पाच वेळा करोना पॉझिटीव्ह सापडल्याचे समजले आणि त्याच्या पायाखालची जमिनंच सरकली.

सध्याच्या घडीला करोनामुळे वाईट वातावरण आहे. करोना झालेल्या लोकांनी घराबाहेर पडू नये, असे म्हटले गेले आहे. पण तरीही हा क्रिकेटपटू घराबाहेर पडला. रस्त्यामध्ये त्याला एक चाहता भेटला. तेव्हा त्या चाहत्यांने या क्रिकेटपटूला आपल्याबरोबर सेल्फी काढण्याचे आवाहन केले. तेव्हा या क्रिकेटपटूने आपण करोना पॉझिटीव्ह असल्याचे चाहत्याला सांगायला हवे होते. पण क्रिकेटपटूने तसे केले नाही. चाहत्याने सेल्फी काढला आणि काही वेळातच त्याला हा क्रिकेटपटू करोना पॉझिटीव्ह असल्याचे समजले.

Google Ad

ही गोष्ट घडली ती पाकिस्तानमध्ये. हारिस रौफ हा पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज रस्त्यावर फिरताना एका चाहत्याला दिसला. मोहम्मद शाहाब घौरी, असे या चाहत्याचे नाव आहे. रौफ दिल्याचवर घौरी त्याच्याकडे गेला आणि त्याच्याबरोबर एक सेल्फी काढली. रौफ हा पाकिस्तानच्या संघात आहे, पण तो इंग्लंडच्या दौऱ्यावर का गेला नाही, असा प्रश्न या चाहत्याला पडला. त्यावेळी या चाहत्याने गुगल सर्च करून रौफची माहिती जाणण्याचा प्रयत्न केला. यामध्ये रौफच्या पाच करोना चाचण्या पॉझिटीव्ह आल्याचे त्याला समजले आणि त्याला मोठा धक्काच बसला.

रौफ हा पाकिस्तानच्या संघाबरोबर सराव करत होता. पण जेव्हा संघाला पाकिस्तानमधून इंग्लंडला पाठवण्याची वेळ आली तेव्हा सर्व खेळाडूंची करोना चाचणी घेण्यात आली. त्यावेळी रैफ हा करोना पॉझिटीव्ह असल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर रौफच्या पाच करोना चाचण्या करण्यात आल्या आणि त्यामध्येही तो पॉझिटीव्ह सापडला. त्यामुळे रौफच्या जागी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीरला इंग्लंडच्या दौऱ्यावर पाठवण्यात आले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

56 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!