Google Ad
Editor Choice india

Budget 2021 : जाणून घ्या , काय महागणार आणि काय स्वस्त होणार ?

महाराष्ट्र 14 न्यूज : देशाचा अर्थसंकल्प सादर झाला आहे. पण या अर्थसंकल्पाचा परिणाम म्हणजे काही वस्तू स्वस्त तर काही महाग झाल्या आहेत. या बजेटमुळे काय महाग आणि काय स्वस्त झाले आहे ते जाणून घेऊयात…

🔴‘हे’ महागलं

Google Ad

पेट्रोलवर २.५ रुपये आणि डिझेलवर ४ रुपये सेस लावण्यात येणार आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होऊ शकते.

अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी काही ऑटो पार्ट्सवर १५ टक्के पर्यंत इंपोर्ट ड्यूटी वाढवली आहे, यामुळे वाहनं महाग होतील.

सोलार इन्व्हर्टर महाग होईल, कारण यावरही इंपोर्ट ड्युटी २० टक्के पर्यंत वाढवण्यात आली आहे.

मोबाईल फोनचे चार्जर आणि हेडफोनवरील इंपोर्ट ड्युटी २.५ टक्के वाढवली आहे, यामुळे या गोष्टी देखील महाग होतील.

मोबाईलशी संबंधित उपकरणांवरील आयात शुल्कात २.५ टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मोबाईल, चार्जर, हेडफोन अधिक महाग होणार आहेत.

मागील ४ वर्षात सरकारनं या उत्पादनांवरील सरासरी जवळपास १० टक्के पर्यंत आयात शुल्क वाढवले. यामुळे देशात मोबाईल फोनचं उत्पादन सुमारे तीन पटीनं वाढले, मात्र या गोष्टी महाग झाल्या आहेत.

कापसावर ५ टक्के अॅग्री इन्फ्रा सेस आकारण्यात येणार आहे. त्यामुळे कापसाच्या किमतीत वाढ होणार

सोलर इन्व्हर्टरवर कस्टम ड्यूटी २० टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे यांच्या किंमतीत देखील वाढ होईल.

मद्यावर १०० टक्के वाढीव सेस लावण्यात आला आहे. त्यामुळे मद्य आणि मद्ययुक्त पेयांच्या किमती वाढणार आहेत.

🔴’हे’ स्वस्त झालं

सोने-चांदीवरील इंपोर्ट ड्युटी १२.५ टक्के कमी केली असल्यानं दागिने स्वस्त होतील.

स्टील उत्पादनावरील इंपोर्ट ड्युटी कमी करून ७.५ टक्के करण्यात आली आहे.

तांब्यावरील इंपोर्ट ड्युटी २.५ टक्के कमी केली आहे.

निवडक लेदरला कस्टम ड्युटीतून वगळण्यात आलं आहे. यामुळे लेदरच्या वस्तू स्वस्त होतील.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

3 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!