Google Ad
Editor Choice india

Delhi : CBSE बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक बोर्डाने केलं जाहीर!

महाराष्ट्र 14 न्यूज : CBSE बोर्डच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर झाली असून त्या दहावीची आणि बारावीची परीक्षा 4 मे ते 11 जून या दरम्यान घेण्यात येत आहेत. या परीक्षेचे वेळापत्रक बोर्डच्या cbse.gov.in या संकेत स्थळावर जाहीर करण्यात आले , असून विद्यार्थी आणि पालकांना त्या ठिकाणी परीक्षेसंबंधी सर्व माहिती मिळेल cbse.gov.in या वेबसाइटवर भेट दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावी अशा दोन पर्यायापैकी एका पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर स्क्रीनवर संपूर्ण माहिती दिसू शकेल. ती माहिती पीडीएफ फॉरमॅटमध्येही डाऊनलोड करणे शक्य आहे.

देशभरातील विविध राज्यातील दहावी आणि बारावीसाठी CBSE बोर्डच्या वतीनं परीक्षा घेण्यात येतात. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल यांनी सांगितलं होतं की 2 फेब्रुवारीला दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात येतील. त्यानुसार आज वेळापत्रकाची घोषणा करण्याता आली आहे. त्यानुसार दहावीच्या परीक्षा या 4 मे ते 10 जून दरम्यान तर बारावीची परीक्षा ही 4 मे ते 11 जून या दरम्यान होणार आहे.

Google Ad

🔴ऑफलाईन होणार परीक्षा

CBSE बोर्डच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीसाठीच्या या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. कोरोना काळात बरंच काम ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलं होतं. पण कोणताही विद्यार्थी या परीक्षेपासून वंचित राहू नये म्हणून ही या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. पण हे करताना कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात येणार आहे. त्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर, मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे.

🔴प्रॅक्टिकल परीक्षा मार्चमध्ये

CBSE च्या वतीनं आधीच जाहीर करण्यात आलं आहे की प्रॅक्टिकल परीक्षा या मार्चमध्ये घेण्यात येतील. त्या वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळ्या दिवशी घेण्यात येतील असंही सांगण्यात आलं आहे. CBSE परीक्षांचा निकाल हा 15 जुलैपर्यंत लागण्याची शक्यता आहे.

Tags
Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!