Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

BREAKING : पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा सर्वाधिक रुग्णवाढ … आजचा आकडा वाचून बसेल धक्का!

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि.३१ मार्च २०२१) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज बुधवार ( दि.३१ मार्च २०२१ ) रोजी २३९६ महानगरपालिका रुग्णालयात बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, यातील पिंपरी चिंचवड शहरातील २२८८ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह तर शहराबाहेरील १०८ रुग्णांचा अहवालात कोरोना पॉझीटीव्ह आला या सर्वांवर पिंपरी चिंचवड मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर १४१० रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत.

Google Ad

🔴पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या
अ – ३२६
ब – ३४५
क – ३०२
ड – ३५५
इ – २६७
फ – २४२
ग – २५६
ह – १९५
एकुण – २२८८

पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ११ पुरुष भोसरी ( ७१ वर्षे ) , चिखली ( ८५ वर्षे ) , पिं . गुरव ( ६५ , ४ ९ वर्षे ) , चिंचवड ( ६५ वर्षे ) , थेरगाव ( ४३ वर्षे ) , पिंपरी ( ४२ , ४० वर्षे ) , यमुनानगर ( ६२ वर्षे ) , काळेवाडी ( ६५ वर्षे ) , निगडी ( ८८ वर्षे ) ०४ स्त्री – चिंचवड ( ७२ वर्षे ) , दिघी ( ६१ वर्षे ) , रहाटणी ( ५५ वर्षे ) , निगडी ( ५५ वर्षे ) येथील रहिवासी आहेत .

पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०३ पुरुष- खडकी ( ४७ वर्षे ) राजगुरुनगर ( ५३ वर्षे ) , काळकुटी ( ३१ वर्षे ) येथील रहिवासी आहे .

टिप : – आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे . मागील २४ तासात ८ मृत्यु झालेले आहेत .

पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच घराबाहेर पडताना मास्क चा वापर करावा. मास्क, सुरक्षित अंतर आणि वेळोवेळी हात धुवण्याने करोना संसर्ग होत नाही हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे.

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

18 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!