Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील शैक्षणिक संस्था , कॉचिग क्लासेस बाबत आयुक्तांनी दिले, हे आदेश … वाचा सविस्तर

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ३१ मार्च : पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाच्या संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आयुक्त राजेश पाटील यानी पिंपरी चिंचवड क्षेत्रातील शाळा , शैक्षणिक संस्था , महाविद्यालये इ . बाबत खालील प्रमाणे मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत .

१. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शैक्षणिक संस्था , प्राथमिक व माध्यमिक शाळा , महाविद्यालये यांचे नियमित वर्ग तसेच खाजगी शिकवणी वर्ग ( Coaching Classes ) दिनांक ३० एप्रिल २०२१ पर्यंत पूर्णतः बंद राहतील . मात्र ऑनलाईन शिक्षणास मुभा राहील . इयना १० वी व १२ वी च्या परीक्षा असल्यामुळे त्यांना या मधून वगळण्यात येत आहे .

Google Ad

२. सर्व कोचिंग क्लासेस ( MPSC / UPSC वगळून ) दिनांक ३० एप्रिल २०२१ पर्यंत बंद राहतील . MPSC , UPSC चे कोचिंग क्लासेस आसन क्षमतेच्या ५० % क्षमतेनुसार त्याकरीता निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना / अटींच्या आधीन गहून मुरु राहतील .

३. मंदर्भीय आदेशान्वये वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंतलागू राहतील .

४. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने यापूर्वी निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील .

कोविड -१५ च्या प्रतिबंधासाठी या कार्यालयाद्वारे वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांचे , मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ते ६० तसेच भारतीय दंड संहितेचे कलम १८८ नुसार अन्य कायदेशीर तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहील , सदर आदेश दि .३१.०३.२०२१ पासून पुढील आदेशापर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात लागू राहतील . असे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

1 Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!