Google Ad
Editor Choice

अजून कितीजण ? पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला लागलेली गळती अद्याप थांबेना …भाजपाच्या आणखी दोन नगरसेवकांनी दिला राजीनामा!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९ मार्च) : आगामी महानगरपालिकेची महानगरपालिकेचा प्रभाग रचना प्रारूप आरखडा जाहीर झाला त्यानंतर पिंपरतील भाजपला एकामागून एक धक्के बसू लागले. तसेच १३ मार्च रोजी नगरसेवक पदाचा कार्यकाळ ही संपत आहे. पिंपरी चिंचवड शहरातीत सुरुवातीला भाजपचे नगरसेवक वसंत बोराटे यांनी भाजपाला रामरामकरत उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधले. त्यानंतर नगरसेविका चंदा लोखंडे यांनीही आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर नगरसेवक तुषार कामठे यांनी आपला राजीनामा सोपवला. त्यानंतर आता या रवी लांडगे आणि संजय नेवाळे या दोघांनी आपला राजीनामा आयुक्तांकडे सोपवला आहे. हे दोन्ही नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर मात्र भूमिका दोन दिवसांनी स्पष्ट करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला लागलेली गळती अद्याप थांबण्याचे नाव घेत नाही. आगामी महानगपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप नगरसेवकांनी राजीनामा देण्याचे सत्र सुरु ठेवले आहेत.

Google Ad

आज भाजपाच्या आणखी दोन नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. भोसरी प्रभागाचे बिनविरोध नगरसेवक रवी लांडगे,चिखली प्रभागाचे नगरसेवक संजय नेवाळे यांनी राजीनामा दिला आहे. पिंपरी चिंचवड भाजपमधील आतापर्यंत सहा नगरसेवकानी आपले राजीनामे दिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून भाजपाला मोठी गळती सुरु असल्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजप आपला गड शाबूत कसा ठेवणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, आणि आता असे कितीजण …? असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!