Google Ad
Editor Choice

दापोडीतील भाजी – फळ विक्रेत्यांना उदरनिर्वाहासाठी हाॅकर्स झोन पुर्णस्थापित करून द्या … ” शिवसेना च्या सौ. सुषमाताई अजित शेलार यांची पिं.चिं. मनपाकडे मागणी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०९ मार्च) : दापोडीतील भाजी विक्री व फळ विक्री करू पाहणारे फेरीवाले व हातगाडीवाले नागरिक हे रस्त्यावरील अतिक्रमण मुळे आर्थिकदृष्ट्या सतत अडचणीत सापडले जातात , रस्त्यावर व फुटपाथ वर हातगाडी लावून व्यवसाय करणे हा कायदेशीर गुन्हा आहे. परंतु जे शिक्षणाने वंचित आहेत , व ज्याना शिक्षण घेऊन देखिल कुठे ही नोकरी भेटली नाही असे नागरिक रस्त्यावर बसून आपल्या उदरनिर्वाह साठी भाजी विक्री व फळ विक्री करू लागले.

आर्थिकदृष्ट्या कमजोर असल्या कारणाने ते स्वतःची जागा घेऊन किंवा भाड्याने जागा घेऊन व्यवसाय करू शकत नाहीत. या कारणास्तव जेमतेम पैसे गोळा करून त्यांनी हातगाडीने व्यवसाय सुरू केला. जेमतेम ४-५ रूपयांची मार्जिन ठेऊन ते त्या भाजी विक्री मागे व फळ विक्री मागे नफा मिळवत आपला चरितार्थ चालवतात, परंतु महानगरपालिके कडून सतत भाजी विक्री व फळ विक्री करणारे फेरीवाले व हातगाडीवाले नागरिकांच्या महिन्यातून तीन- चार वेळा तर हातगाडया उचलल्या जातात आणि प्रत्येक वेळी दंड वसूल केला जातो.

Google Ad

कमवायचं किती न त्या मागे कीती गमवल जात याचा काही ताळमेळच राहिला नाही. अशा दापोडी तील त्रस्त पथारी व्यावसायिकांना न्याय मिळवून देण्यासाठी दापोडी मध्ये राष्ट्रीय फेरीवाले धोरणांतर्गत हाॅकर्स झोन पुर्णस्थापित करून आपला उदरनिर्वाह करण्यासाठी भाजी विक्री व फळ विक्री असा किरकोळ व्यवसाय करू पाहणा-याच्या नागरिकांना योग्य ती जागा व स्टाॅल देऊन दापोडीतील नागरिकांना उदरनिर्वाह साठी आर्थिक मदत द्यावी, या करिता ” शिवसेना च्या सौ. सुषमाताई अजित शेलार (शहर अध्यक्ष- भारतीय कामगार संघटना पिंपरी चिंचवड शहर )” यांनी “ह प्रभाग” मधील वरिष्ठ अधिकारी विजय थोरात सरांना निवेदन अर्ज दिला*. व तुमच्या मागणीस त्वरित “ह प्रभाग संमिती” मार्फत विचार करून तुमची मागणी पुर्ण करू, असा शब्द ही वरिष्ठ अधिकारी विजय थोरात सरांनी दिला.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!