Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

भाजपचे पिंपरी चिंचवड निरीक्षक यांची प्रभाग क्रं. ३१ नवी सांगवी-पिंपळे गुरवला भेट … पुणे पदवीधर निवडणूकीच्या नियोजनाची केली स्तुती!

महाराष्ट्र 14 न्यूज : पुणे पदवीधर मतदार संघाचे भाजपचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारार्थ निवडणूक पूर्व तयारीसाठी पिंपरी-चिंचवडची भाजप टीम सज्ज झाली आहे. त्यासाठी त्यांनी प्रचाराचेच नाही, तर मतदान तयारीचेही मायक्रो प्लँनिंग केले आहे. त्याअंतर्गत प्रत्येक कार्यकर्ता हा पन्नास मतदारांना भेटून त्यांना कनव्हिंस करणार आहे. तसेच या मतदारांना मतदानाच्या दिवशी बाहेर काढून त्यांचे मतदान करून घेण्याची जबाबदारीही या प्रत्येक कार्यकर्त्यावर सोपवण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची ही मतदार संपर्क मोहीम सुरु झाली. तर, प्रचाराच्या शेवटच्या दिवशी २९ तारखेला मतदार महासंपर्क अभियान शहरात राबवले जाणार आहे.त्यात शहराचे आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे तसेच पदाधिकारी सुद्धा सामील होणार असून ते प्रत्येकी पन्नास मतदारांना भेटणार आहेत, अशी माहिती पक्षाचे शहर सरचिटणीस अॅड मोरेश्वर शेडगे यांनी आज दिली. पुणे पदवीधरचे पिंपरी चिंचवडचे निरीक्षक निरंजन डावखरे यांनी प्रभाग ३१ नवी सांगवी-पिंपळे गुरव येथे भेट दिली व कामकाजाचा आढावा घेतला.

Google Ad

यावेळी नगरसेविका माधवी राजापूरे, सीमा चौगुले, नगरसेवक अंबरनाथ कांबळे, माजी स्थ्यायी समिती अध्यक्ष राजेंद्र राजापुरे, प्रभाग अध्यक्ष मारुती कवडे, भाऊसाहेब जाधव, श्रीकांत पवार, रामदास पोखरकर, श्यामराव धस, शैलेश जाधव व भाजपचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. यावेळी आमदार निरंजन डावखरे यांनी प्रभाग ३१ मध्ये पदवीधर निवडणूकी करीता सुरू असलेल्या कामाचे कौतुक केले, व याप्रमाणे मतदार संघात सर्वांनी काम केले तर आपणांस ही निवडणूक अवघड नाही, असेही ते बोलले, तसेच काही सूचनाही केल्या.

मतदार भेट अभियानासाठी शहरातील पक्षाच्या ५३० कार्यकर्त्यांची फळी तयार करण्यात आली असून त्यांनी मतदारांशी संपर्क सुरु केला आहे. त्यांना प्रत्येकी पन्नास मतदारांची यादी देण्यात आली आहे. त्यानुसार ते त्यांना भेटून मतदान कसे करायचे आणि भाजपलाच मत द्या, असे सांगणार आहेत. एवढेच नाही, तर मतदानाच्या दिवशी या मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्याची जबाबदारीही या प्रत्येक कार्यकर्त्याला पार पाडायची आहे,

यावेळी प्रथमच राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस अशा तीन पक्षांचा म्हणजे महाविकास आघाडीचा सामना करावा लागत असल्याने भाजपने ही जागा व एकूणच ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड भाजपने कसल्याही परिस्थिती विजय प्राप्त करण्यासाठी अत्यंत सुक्ष्म पद्धतीने नियोजन केले आहे. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर निरीक्षक आमदार निरंजन डावखरे हे शहरात तळ ठोकून आहेत व प्रभागवार कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन त्यांना मार्गदर्शन करत आहेत.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!