Google Ad
Editor Choice

Delhi : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर … 9500 रुपयांचा अतिरिक्त प्रवासी भत्ता मिळणार , जाणून घ्या

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८जुलै) : अलीकडेच केंद्रीय कर्मचार्‍यांच्या मागणीचा विचार करता मोदी सरकारने गेल्या दीड वर्षांपासून महागाई भत्त्यावरील बंदी काढून 11 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. पूर्वी महागाई भत्ता 17 टक्के होता, जो आता वाढून 28 टक्के झालाय. 1 जुलै 2021 पासून याची अंमलबजावणी झालीय. महागाई भत्त्यातील (DA) वाढीचा थेट परिणाम वाहतुकीच्या भत्त्यावरही होणार असून, त्यातही वाढ झालीय.

केंद्रीय कर्मचार्‍यांचे परिवहन भत्ते वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या शहरांमध्ये बदलत असतात. दिल्ली, अहमदाबाद, बंगळुरू, गाझियाबाद, बृहत्तर मुंबई, हैदराबाद, जयपूर, पाटणा अशी शहरे उच्च TPTA प्रकारात येतात. याखेरीज उर्वरित शहरेही येतात. टीपीटीए कर्मचार्‍यांच्या विविध स्तरांसाठी निश्चित केले गेले आहेत, ज्यावर महागाई भत्ता जोडून कर्मचार्‍यांना परिवहन भत्ता मोजला जातो.

Google Ad

▶️Total Transport Allowance = TA + [(TA x DA%) / 100]
उदाहरणार्थ, उच्च TPTA शहरांमध्ये 1-2 स्तरासाठी टीपीटीए 1350 रुपये आहे, 3-8 स्तराच्या कर्मचार्‍यांसाठी 3600 रुपये आणि त्यावरील पातळी 9 साठी ते 7200 रुपये आहेत. सद्यस्थितीत डीएचा स्तर 17 टक्के होता, जो 1-2 लेव्हलसाठी 230 रुपये, 3-8 लेव्हलसाठी 612 रुपये आणि वरील लेव्हल 9 साठी 1224 रुपये होता. अशा प्रकारे एकूण परिवहन भत्ता 1580 रुपये, 4212 आणि 8424 रुपये करण्यात येत होता.

▶️आता तुम्हाला किती प्रवासी भत्ता मिळेल?
जर महागाई भत्ता 28 टक्के झाला तर एकूण प्रवासी भत्ता 1728 रुपये, 4608 रुपये आणि 9216 रुपये होईल. अशा प्रकारे मासिक तत्त्वार 149 रुपये, 396 रुपये आणि प्रवासी भत्त्यामध्ये 792 रुपयांची वाढ झालीय. वार्षिक आधारावर या कर्मचार्‍यांना 1788 रुपये, 4752 रुपये आणि 9504 रुपये अधिक मिळतील. महागाई भत्ता 17 टक्के होता जो आता वाढून 28 टक्के झालाय.

▶️इतर शहरांसाठी टीपीटीए काय?
त्याचप्रमाणे अन्य शहरांकरिता 1-2 स्तरासाठी टीपीटीए 900 रुपये, 3-8 पातळीसाठी ते 1800 रुपये आणि पातळी 9 आणि त्याहून अधिक 3600 रुपये आहेत. सध्या टीएवर 17 टक्के दराने डीए 153 रुपये, 306 आणि 612 रुपये आहे. अशा प्रकारे एकूण प्रवासी भत्ता 1053 रुपये, 2106 रुपये आणि 4212 रुपये होता.

▶️इतर शहरांतील कर्मचाऱ्यांना प्रवासी भत्ता किती मिळणार?
महागाई भत्ता 28 टक्क्यांपर्यंत वाढल्यानंतर डीएवरील टीए 252 रुपये, 504 आणि 1008 रुपये झाला. एकूण प्रवासी भत्ता 1152 रुपये, 2304 आणि 4608 रुपये झालाय. पूर्वीच्या तुलनेत त्यात 99 रुपये, 198 रुपये आणि 396 रुपयांची वाढ झाली. वार्षिक आधारावर, स्तरावरील 1-2 स्तरावरील कर्मचार्‍यांना 1188 रुपये, 3-8 स्तरावरील कर्मचार्‍यांना 2376 रुपये आणि 9 आणि त्यापेक्षा अधिक स्तरावरील कर्मचार्‍यांना 4752 रुपये अधिक वेतन मिळेल

Google Ad

About the author

Maharashtra14 News

4 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!