Google Ad
Editor Choice Travel

सावधान : वीकेण्ड एन्जॉय करताय … पुणे जिल्ह्यातील सर्वच पर्यटन स्थळांवर १४४ कलम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७जुलै) : बेशिस्त नागरिकांना धडा शिकवण्यासाठी पुणे पोलिसांची मोहीम सुरु झालीय. विकेंड लॉकडाऊन असूनही पर्यटन स्थळी नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करत असल्याचे लक्षात येताच आज पासून पुणे जिल्ह्यातील सर्वच पर्यटन स्थळांवर 144 कलम लावण्यात आलंय.

ज्या जिल्ह्यांमध्ये किंवा ज्या शहरात कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे, अशा ठिकाणी विकेंड लॉकडाऊन सुरु आहे. परंतु नागरिकांना याचं कसलंही भान राहिलं नाहीय. लॉकडाऊन असून देखील नागरिक मोठ्या संख्येने विनाकारण घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे. अशात शासन आणि प्रशासन कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात यावी म्हणून विविध प्रयत्न करत आहे. त्याच अनुषंगाने जिल्ह्यातल्या पर्यटन स्थळांवर आजपासून कलम 144 लागू करण्यात आलेला आहे.

Google Ad

लॉकडाऊन असूनही पुण्यातील खडकवासला येथे पर्यटक मोठ्या संख्येने आले आहेत. या ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली असून नेमक्या कोणत्या कारणास्तव नागरिक घराबेहर पडले आहेत, याची ते माहिती घेत आहेत. तसंच गाड्यांची तसापणी करत आहेत.

पुणे जिल्ह्यात अनेक किल्ले आहेत. तसंच प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण लोणावळा-खंडाळाही आहे. राज्यातल्या महत्त्वाच्या शहरातून वीकेण्ड एन्जॉय करण्यासाठी पर्यटकांची पुण्याकडे ओढ असते. असे पर्यटक जर घराबाहेर पडणार असतील तर त्यांना कारवाईला सामोरं जावं लागेल म्हणून सावधान…!

Google Ad

About the author

Maharashtra14 News

15 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!