Google Ad
Editor Choice

महसुली सेवांबाबत मोठी घोषणा … आजपासून नवा सातबारा, जमिनीच्या खोट्या नोंदी करता येणार नाही : बाळासाहेब थोरात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ऑगस्ट)  : राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज (1 ऑगस्ट) महसुली सेवांबाबत मोठी घोषणा केलीय. यानुसार आजपासून महाराष्ट्रातील नागरिकांना नव्या फॉरमॅटमध्ये ऑनलाईन सात बारा (7/12) मिळणार आहे. यामुळे आता तलाठ्यांचा वेळ वाचले आणि कुणालाही जमिनीच्या खोट्या नोंदी करता येणार नाही, असंही थोरातांनी नमूद केलं. ते पुण्यात बोलत होते.

बाळासाहेब थोरात म्हणाले, “आज महसूल दिन त्यानिमित्ताने शुभेच्छा. या निमित्ताने काही सेवा सुरू करत आहोत. यामुळे सहजता, पारदर्शकता आणि बिनचूक सेवा सुरू होईल. सर्व सेवा ऑनलाईन असेल. सात बारा ऑनलाईन केलाय. आजपासून 7/12 नव्या फॉरमॅटमध्ये मिळणार आहे. त्यासाठी खूप काम करावे लागले. मिळकत पत्रिका सुद्धा पूर्ण होत आलीय. ई म्युटेशन सुद्धा पूर्ण होत आलेय, लवकरच मिळेल. 4 ठिकाणी जमिनी असतील तर एकच सातबारा मिळेल. 2008 पासूनचे फेरफार सुद्धा डिजीटल रुपात मिळतील. यामुळे तलाठ्याचा वेळ वाचणार आहे.”

स्टॅम्प ड्युटीत 6 महिने सवलतीचा मोठा फायदा

Google Ad

“स्टॅम्प ड्युटीत 6 महिने सवलत देण्यात आली. या काळात अनेक कागदपत्रे रजिस्टर झाली. याची नागरिकांना मोठी मदत झाली. बिल्डर, डेव्हलपर्स यांनाही मदत झाली. आम्हाला सुद्धा त्याचा चांगला फायदा झाला,”
बाळासाहेब थोरात म्हणाले, “ई पीक पाहणी सुद्धा सुरू आहे. स्वतःच शेतकरी नोंद करू शकणार आहेत. त्याचं उद्घाटन मुख्यमंत्री करणार आहेत. तलाठी त्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे. काही तालुक्यांमध्ये याला चांगला प्रतिसाद मिळतोय. टाटा ट्रस्टची मदत मिळत आहे. त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. यामुळे पिकांची लागवड कळणार आहे. विमा कवच, अनुदान आणि कर्जाची माहिती देखील मिळणार आहे.”

जमिनीच्या खोट्या नोंदी करता येणार नाही”

“सात बारा काढण्यासाठी 15 रुपये रक्कम भरावी लागेल. बँकांसोबत करार करणार आहे. बँक पण सात बारा काढू शकतील. त्याचा नागरिक लाभ घेऊ शकतील. खोट्या नोंदी करता येणार नाही. फोटो आणि लोकेशन मिळेल. गैरप्रकार होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाईल. अडचणी आल्या तर आम्हाला समजलं पाहिजे. दोष समोर आले तर त्या त्या वेळी ते सोडवू,” असंही थोरातांनी नमूद केलं.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

16 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!