Google Ad
Editor Choice

हृदयद्रावक : लोकवर्गणीतून १६ कोटी रुपये खर्च करून उपचार पूर्ण झालेल्या … भोसरीच्या वेदिका शिंदेचा श्वास अखेर थांबला!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ऑगस्ट) : नियतीने अखेर तिला या जगातून कायमचं हिरावून घेतलं… भोसरी येथील ११ महिन्यांच्या वेदिका सौरभ शिंदे  हिला स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी टाईप-वन हा दुर्मिळ आजार झाला होता. त्यावरील उपचारासाठी तिला पुण्यातील खासगी रुग्णालयात ‘झोलगेन्स्मा’ हे १६ कोटी रुपयांचे इंजेक्शन दीड महिन्यांपूर्वी दिले होते. आज रविवारी (०१ ऑगस्ट) सायंकाळी तिचे निधन झाले

वडिलांनी व कुटुंबीयांनी तिला झालेल्या दुर्घर आजारातून बरे होण्यासाठी लोकवर्गणीतून तब्बल १६ कोटी रुपये जमाही केले व तिला ते महागडे इंजेक्शन ही दिले होते . पण आज सायंकाळी अचानक ती खेळत असताना तिला श्वासाचा त्रास झाला . तिच्या उजव्या फुफ्फुसास श्वास घेण्यास त्रास झाला व तिला तिच्या पालकांनी पटकन खाजगी रुग्णालयात हलवले . ती तब्बल एक तास मृत्यूशी झुंज देत होती . डॉक्टर शक्य तितके प्रयत्न करत होते , पण त्यांच्या प्रयत्नाला यश आले नाही व त्या कोवळ्या जिवाने अखेरचा श्वास घेतला .

Google Ad

काहीच दिवसांपूर्वी वेदीकाचे वडील सौरव शिंदे यांनी व वेदीकाचे आई व आजोबांनी तिच्या उपचारासाठी १६ कोटी रुपयांचे इंजेक्शन बाहेर देशातून मागवण्यासाठीचे आवाहन जनतेकडे केले होते . त्यांच्या आवाहनाला साद देत जनतेने भरभरून प्रतिसाद दिला व सर्वच थरातून तिला मदतीचा ओघ सुरू झाला .

वृत्त वाहिन्या व वृत्तपत्रातून , पोर्टलच्या माध्यमातूनही मदतीचे आवाहन केले होते.वेदीकासाठी शिरूरचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनीही तिची कस्टम ड्युटी माफ करण्यासाठी व मदतीसाठी लोकसभेत आवाज उठवला . व पंतप्रधान नरेंद्र मोदी व मोदी सरकार ला मदतीचे आवाहन केले होते . व त्या इंजेक्शनची कस्टम ड्युटी माफ करून घेतली . सगळीकडूनच म्हणजे राजकीय , मीडिया , सामाजिक , क्रीडा , सांस्कृतिक सर्वच क्षेत्रातून मदतीचा ओघ सुरू झाला आणि पाहता पाहता तब्बल १६ कोटी ही अशक्यप्राय रक्कम लोकवर्गणीतून जमा झाली आणि इंजेक्शन भारतात आले .

पुण्यातील मंगेशकर हॉस्पिटलमध्ये तिच्यावर इंजेक्शन देऊन पुढील उपचार घेऊन वेदिका पूर्ण बरी होऊन घरी आली होती . सगळे व्यवस्थित सुरू आहे असे वाटत असतानाच आज खाजगी रुग्णालयात वेदिका ने अखेरचा निरोप घेतला . ही बातमी समजताच पिंपरी चिंचवड शहराबरोबरच सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

12 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!