Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्षपदी ‘शाम जगताप’ यांची नियुक्ती … पक्षश्रेष्ठींनी घेतली कार्याची दखल!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ऑगस्ट) : आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष आपला वजन वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी, पिंपरी चिंचवड शहरात वातावरण तापू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जोरदार फिल्डींग सुरू झाल्याचे दिसत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अनेकांवर पक्षाने वेगवेगळ्या जबाबदाऱ्या टाकल्या आहेत.

पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी शाम जगताप यांची निवड करण्यात आली आहे. तसे निवडीचे पत्र महाराष्ट्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख व महाराष्ट्र प्रदेशचे कार्याध्यक्ष रविकांत वर्पे यांच्या हस्ते शाम जगताप यांना देण्यात आले.

Google Ad

या कार्यक्रमावेळी पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष विशाल वाकडकर, विरोधी पक्ष नेते राजू मिसाळ, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा वैशालीताई काळभोर, विशाल काळभोर, लाला चिंचवडे, संदीप चिंचवडे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पिंपळे गुरव भागात शाम जगताप यांनी चिंचवड विधानसभा युवक अध्यक्षपदाच्या माध्यमातून विविध कामे केले आहेत. पक्ष संघटना वाढविण्यासाठी त्यांनी संघटनात्मक बांधणी केली आहे. कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये अनेकांना मदतीचा हात दिला.

शाम जगताप यांनी केलेल्या कार्याची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी शाम जगताप यांच्यावर आता पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. याही पदाला ते योग्य न्याय देतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

यावेळी बोलताना ‘शाम जगताप’ म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरात अनेक मोठं मोठी कामे झाली. भविष्यातही ही कामे करण्याची संधी पिंपरी चिंचवडकर आम्हाला देतील असे काम आम्ही पक्षाच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरात करत आहोत आणि करत राहू. आता पक्षाने दिलेली शहराची जबाबदारी मी जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कशी पार पाडता येईल याकडे युवकांच्या माध्यमातून लक्ष देणार आहे, व पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणार!

Google Ad

About the author

Maharashtra14 News

79 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!