Google Ad
Editor Choice

श्रोत्यांची मने जिंकत पिंपळे गुरव मध्ये रंगले ‘अक्रूर महाराज साखरे’ यांचे बहारदार कीर्तन … म्हणाले …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ नोव्हेंबर) : पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव येथे भैरवनाथ मंदीरात संकीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. आज रविवारी ह.भ.प. अक्रूर महाराज यांच्या कीर्तनाची सेवा पार पडली.

यावेळी अक्रूर महाराज म्हणाले, संत आपल्याला जागृती देतात, आणि त्याच करीता मंदिर व आश्रम आहेत. महाराज म्हणाले, “धन घेणे आणि देणे याला विरोध नाही, पण कोणाचे घेता आणि कोणाला देता हे महत्त्वाचे आहे”. यावेळी त्यांनी कर्मचारी भाऊराव पाटील यांचा दाखला दिला. तर “अखंड सदा नाम घोष” ... या अभंगाचे चरण घेत, धर्माचे पालन कसे करावे ? तरुणांनी आणि घरातील जेष्ठांनी त्या करीता काय करावे, त्याकरिता त्यांनी अनेक उदाहरणे देऊन श्रोत्यांची मने जिंकली.

Google Ad

समस्त गावकरी विठ्ठल भजनी मंडळ व पिंपळे गुरव ग्रामस्थ यांच्या विद्यमाने श्री भैरवनाथ जन्मोत्सव, रौप्य महोत्सवी वर्ष आणि काकडा आरती सांगता समारंभाचे आयोजन श्री भैरवनाथ मंदीर, श्री क्षेत्र पिंपळे गुरव, येथे करण्यात आले आहे. यावेळी श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम संकिर्तन यज्ञ सोहळ्याची सुरुवात आज सकाळी करण्यात आली, तर सायंकाळी अक्रूर महाराज साखरे यांच्या ‘अखंड सदा नाम घोष’ …या अभंगाने किर्तनाची सेवा झाली.

यावेळी सांगवीतील बालयोगी नंदकुमार महाराज दत्त आश्रमाचे ह.भ.प. तुकाराम महाराज, कासारवाडी येथील श्री साई सेवा कुंज आश्रमचे ह भ प शिवानंद स्वामी महाराज, ह.भ.प. बाळासाहेब शितोळे महाराज , ह.भ.प. ब्रबुहान वाघ महाराज, उद्योजक विजूशेठ जगताप, सुभाषदादा काटे, भाऊसाहेब जाधव, गणेश गावडे, सखाराम रेडेकर , अध्यक्ष ह.भ.प.श्री. जयवंत मारुती देवकर व उपाध्यक्ष श्री. मारुती श्रीपती जांभूळकर आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!