Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रका प्रमाणे मुस्लिम बांधवांना बकरी ईद साजरी करण्याच्या मनपा प्रशासनाच्या सूचना!

महाराष्ट्र 14 न्यूज : मुस्लीम बांधवाकडून बकरी ईद ( ईद – उल-अजहा ) दि .०१ / ०८ / २०२० रोजी साजरी होत असून या सणानिमित्ताने लहान – मोठ्या जनावरांची कुर्बानी करण्याची प्रथा आहे . कोविड -१९ मुळे उदभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी बकरी ईद साध्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय शासनाद्वारे घेण्यात आलेला असून महाराष्ट्र शासन गृह विभागाचे शासन परिपत्रकाप्रमाणे बकरी ईद साजरा करण्याचे अनुषंगाने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सुचना निर्गमित करण्यात आल्या आहेत .

१. कोविड -१९ मुळे उदभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांत बंदी आहे . त्यास अनुसरून बकरी ईदची नमाज मस्जिद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता , नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी .
२. सध्या कार्यान्वीत असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील . नागरीकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अथवा दूरध्वनीवरून जनावरे खरेदी करावी .

Google Ad

३. नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी .
४. प्रतिबंधित ( Containment ) क्षेत्रामध्ये सध्या लागू करण्यात आलेले निबंध कायम राहतील . त्यामध्ये बकरी ईद निमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही .
५. बकरी ईदच्या निमित्ताने नागरीकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये किंवा एकत्र जमू नये.
६. कोवीड -१९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिकेद्वारे विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार साध्या पद्धतीने बकरी ईद साजरी करावयाची असून प्रतिकात्मक कुर्बाणी करण्यात यावी तसेच कुठेही गर्दी होणार नाही याची उचित दक्षता घ्यावी. असे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

1,290 Comments

Click here to post a comment