Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

अनलॉक ३.० मध्ये १ ऑगस्ट पासून पिंपरी चिंचवड शहरात, काय चालू … काय बंद!

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी मनपा क्षेत्रामध्ये कोवीड -१९ च्या प्रसारास प्रतिबंधित करण्यासाठी ‘अनलॉक ३.० मध्ये १ ऑगस्ट २०२०’ पासून खालीलप्रमाणे सुधारित आदेश निर्गमित केले आहेत.

१)संपुर्णत : प्रतिबंधीत करणेत येत असलेल्या बाबी – 
केंद्रिय गृह मंत्रालयाच्या परवानगी शिवाय इतर सर्व आंतरराष्ट्रीय विमानप्रवास > विशेष आदेशाद्वारे परवानगी प्राप्त प्रवासाव्यतीरिक्त सर्व देशांतर्गत विमान व रेल्वेद्वारे प्रवामी वाहतूक > मेट्रो रेल प्रवास >
शाळा , कॉलेज , शैक्षणिक संस्था , प्रशिक्षण संस्था , कोचिंग क्लासेस , > रेस्टॉरंट व इतर आदरातिथ्य सेवा ( वैद्यकिय , पोलीस , सरकारी कार्यालये , बस डेपो , रेल्वे स्टेशन , विमानतळ , अलगीकरण केंद्र याठिकाणीचे उपहारगृह चालू राहतील )

Google Ad

सिनेमा हॉल , व्यायामशाळा , जलतरण तलाव , बार , सर्व प्रकारचे सभागृह , नाट्यगृह , मनोरंजन पार्क आणि तत्सम जागा > सर्व प्रकारचे सामाजिक , धार्मिक राजकिय , क्रीडा , मनोरंजन , सांकृतिक , शैक्षणिक उपक्रम सभा संमेलन व तत्सम मोठ्या संख्येने लोक एकत्र येऊ शकतील अशा प्रकारचे कार्यक्रम → सर्व धार्मिक स्थळे , मर्व धार्मिक कार्यक्रम , सभा , संमेलने बंद राहतील .

२ ) पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रातील सर्व व्यक्तींच्या हलचाली अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय सेवा या कारणांशिवाय रात्री ९ .०० ते सकाळी ५.०० या कालावधीत प्रतिबंधीत करण्यात येत आहेत

३ ) पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रातील ६५ वर्षावरील सर्व व्यक्ती , अति जोखमीचे आजार ( मधुमेह , उच्च रक्त दाब , दमा , यकृत व मुत्रपिंडाचे आजार , कर्करोग , HIV बाधित रुग्ण इ . ) असलेल्या व्यक्ती , गरोदर महिला , वय वर्ष १० पेक्षा कमी वयोगटातील मुले यांना अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर जाता येणार नाही .

४ ) प्रतिबंधित क्षेत्र ( कंटेनमेंट झोन ) – या कार्यालयाकडून वेळोवेळी घोषीत करणेत आलेल्या प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये वैद्यकिय सेवा , अत्यावश्यक सेवा , अत्यावश्यक वस्तू पुरवठयाची साखळी कायम ठेवण्यासाठी आवश्यक वाहतुक वगळता प्रतिबंधीत क्षेत्रामधून नागरिकांना येणे – जाणे करणेसाठी प्रतिबंध असेल . प्रतिबंधीत क्षेत्र ( कटेंनमेंट झोन ) विषयक महानगरपालिकेने वेळोवेळी निर्गत केलेल्या आदेशातील सर्व सुचनांचे पालन करणे बंधनकारक राहील , ५ ) सर्व आस्थापना प्रमुखांनी त्यांचे अधिनस्त कार्यरत कर्मचारी यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या भ्रमणध्वनीमध्ये आरोग्य सेतू अॅप आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे स्मार्ट मारथी अॅप डाऊनलोड केल्याची खात्री करून घ्यावी . आरोग्य सेतू अँप च्या माध्यमातून रोगाची संभाव्य लागण विषयी सूचना प्राप्त होत असल्यामुळे व्यक्तीस स्वसंरक्षणासाठी त्याचा उपयोग होतो .

६ ) सर्व वैद्यकिय व्यावसायिक , परिचारीका , पॅरामेडीकल कर्मचारी , सफाई कर्मचारी व अँबुलन्स यांना शहर , राज्य अंतर्गत आणि अंतरराज्य वाहतुकीसाठी परवानगी राहील . ७ ) सर्व प्रकारचे मालवाहतुकीचे ट्रक ( रिकाम्या ट्रक सह ) यांना वाहतुकीसाठी परवानगी राहील . ८ ) पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रात या आदेशामध्ये संपुर्णत : प्रतिबंधीत केलेल्या बाबी , विशेष आदेशाब्दारे प्रतिबंधीत केलेल्या बाबी वगळता इतर सर्व उपक्रम चालू ठेवण्यासाठी खालील अटी व शींच्या अधिन राहून परवानगी देणेत येत आहे . अ ) परवानगी देणेत आलेल्या उपक्रमांना सुरु करणेसाठी शासकिय कार्यालयाकडून स्वतंत्रपणे परवानगी घेणेची आवश्यकता नाही .
ब ) क्रीडा संकुले , स्टेडियम यांचे बाह्य भाग व खुली सार्वजनिक ठिकाणे , महापालिकेची मैदाने व उद्याने , संस्था / सोसायटीची मैदाने , उद्यान नागरिकांसाठी खुली राहतील . तथापि अशा ठिकाणी फक्त वैयक्तिकरित्या करावयाचे व्यायाम प्रकार , एकट्याने खेळावयाचे खेळ उदा . सायकल , जॉगींग , धावणे , चालणे , योगासने , दोरीवरच्या उड्या इत्यादींना मुभा राहील . तसेच गोल्फ , फायरिंग रेंज , जिम्नस्टिक , टेनिस , आऊट डोर बॅडमिंटन , मलखांब , इ . दि .०५ ऑगस्ट २०२० पासून सुरू करता येतील .

प्रेक्षक व सामुहिक उपक्रम , सांघिक खेळ , खेळाचे साहित्य एका पेक्षा जास्त खेळाडूंनी हाताळावयाची शक्यता असलेले सर्व खेळ उदा . क्रिकेट , फुटबॉल , बॅडमिंटन , कबड्डी , खो – खो , हॉकी इत्यादी यांना परवानगी नाही . अशा ठिकाणी सामाजिक | शारिरीक अंतर ठेवणे बंधनकारक असेल . सदर परवानगी सकाळी ६.०० ते सायंकाळी ७.०० पर्यंत असेल . इनडोअर स्टेडियम किंवा स्टेडियमच्या आतील परिसरात कोणत्याही उपक्रम / कार्यक्रम / खेळ यांना परवानगी असणार नाही .
क ) सर्व सार्वजनिक व खाजगी वाहतूक खालील प्रमाणे सुरु करता येईल . → दुचाकी – चालक + एक ( हेल्मेट व मास्क वापरणे बंधनकारक ) → तीन चाकी- चालक + दोन व्यक्ती – चारचाकी- चालक + तीन व्यक्ती

ड ) विनिर्दिष्ठ बाजारपेठे व्यतिरीक्त इतर दुकाने सकाळी ९ .०० ते सायंकाळी ७.०० या दरम्यान सुरु राहतील . तथापि सदर ठिकाणी गर्दी होऊन सामाजिक | शारिरीक अंतर राखण्याचा निकषांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास बाजारपेठा / दुकाने तात्काळ बंद करणेत येतील .
इ ) शॉपीग मॉल , मार्केट कॉम्पलेक्स सकळी ९ .०० ते सांयकाळी ७.०० वाजेपर्यंत दि .५ ऑगस्ट २०२० पासून सुरू करता येतील . त्यामध्ये थिएटर , फुड कोर्ट , रेस्टॉरंट बंद राहतील . परंतू फुड कोर्ट , रेस्टॉरंट मधील घरपोच सेवा सुरळीत राहतील . फ ) मंदर्भ ११ नुसार हॉटेल , लॉजिंग , गेस्ट हाऊस मधील निवास व्यवस्था सेवा ३३ % च्या मर्यादेत सुरू राहिल . मात्र ज्या हॉटेल्समध्ये संस्थात्मक अलगीकरण अथवा संस्थात्मक विलगीकरण ( Institutional quarantine / Institutional Isolation ) केले जात असेल तेथे निवास व्यवस्था १०० % पर्यंत करणे अनुज्ञय राहील . हॉटिल किंवा लॉजिंग मधील रेस्टॉरर कॅन्टीनची सोय केवळ तेथे निवासी राहणा – या प्रवाशांसाठी सुरु राहतील .

१ ) पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रातील सर्व औद्योगिक आस्थापनामध्ये कामावर उपस्थित राहणेसाठी महानगरपालिकेकडून पुर्वपरवानगी घेणेची आवश्यकता असणार नाही . २ ) औद्योगिक आस्थापना १०० टक्के कामगार क्षमतेसह सुरु ठेवता येतील . तथापि सर्व खाजगी कार्यालये व माहिती तंत्रज्ञान विषयक आस्थापना जास्तीत जास्त ५० टक्के मनुष्यबळासह सुरु करता येतील व उर्वरित मनुष्यबळाब्दारे शक्य असेल तोपर्यंत घरातून कामकाज ( Work from Home ) करणेस प्राधान्य द्यावे . ३ ) सर्व शासकीय कार्यालये ( आरोग्य , वैद्यकीय व अत्यावश्यक सेवा वगळून ) १५ % मनुष्यबळासह कार्यालये सुरू ठेवता येतील . ह ) विनिर्दिष्ठ बाजारपेठा मधील दुकाने ही सकाळी ९ .०० ते सायंकाळी ७.०० या वेळात मुरु राहतील तथापि त्यासाठी पी१- पी -२ तत्वानुसार रस्त्याच्या एका बाजुची दुकाने सम तारखेस उघडी राहतील व दुस – या बाजुची दुकाने विषम तारखेस उघडी राहतील . त्यामुळे अटी व शर्तीमुळे बाजारपेठामध्ये गर्दी टाळणे शक्य होईल व पर्यायाने कोविड -१९ चा वेगाने होऊ शकणा – या प्रसारास प्रतिबंध घालता येईल . तथापि , निकषांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास बाजारपेठा / दुकाने तात्काळ बंद करणेत येतील . अटी व शर्तीस अधिन राहून नाभीक दुकाने , ब्युटी पार्लर चालू करणेबाबत आदेश निर्गमित करणेत आलेला आहे .
सदर आदेश अनलॉक ३.० मध्ये दि .१ / ०८ / २०२० पासून पुढील आदेश होई पर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात लागू राहतील .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

48 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!