Google Ad
Editor Choice Sports

पिंपरी चिंचवडच्या सोनल बुंदेले यांची … खेलो इंडिया हरियाणा धनुर्विद्या स्पर्धेमध्ये स्पर्धाप्रमुख म्हणून नियुक्ती!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ जून) : केंद्रिय क्रिडामंत्रालय व भारतीय खेल प्राधिकरण यांच्या वतीने आयोजित खेलो इंडिया या स्पर्धा ४ ते १३  जून २०२२  दरम्यान हरियाणा येथे होणार आहे. धनुर्विद्या या क्रिडाप्रकारात पिंपरी चिंचवडच्या  आंतरराष्ट्रीय खेळाडू राज्य संघटनेच्या सहसचिव सोनल बुंदेले यांची हरियाणा येथील स्पर्धेत  स्पर्धाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. स्पर्धा १० ते १३ जून दरम्यान पंजाब यूनिर्वसिटी चंदीगड येथे पार पडणार आहेत. खेलो इंडिया धनुर्विद्या स्पर्धेच्या स्पर्धाप्रमुखपदी काम पाहणाऱ्या त्या पहिल्या महिला  आहेत. संपूर्ण  स्पर्धेचे नियोजन सोनल बुंदेले यांच्या  नियंत्रणाखाली पार पडणार आहेत. ही बाब पिंपरी चिंचवडकरांसाठी अभिमानस्पद आहे. त्यांच्या सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.  

नुकत्याच बेंगलोर येथे पार पार पडलेल्या  खेलो इंडिया यूनिर्वसिटी गेम्स मध्ये देखील त्यांनी पंच म्हणून काम पाहिले. टोकियो ऑलंपिकच्या भारतीय संघाच्या निवड प्रक्रियेमध्ये तसेच अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धामध्ये देखील त्यांनी पंच म्हणून काम पाहिले. तसेच राष्ट्रीय व राज्य स्पर्धांच्या आयोजनाचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.

Google Ad

सध्या  सोनल बुंदेले या महाराष्ट्र धनुर्विदया संघटनेच्या सहसचिव व पिंपरी -चिंचवड धनुर्विद्या संघटनेच्या सचिवपदी कार्यरत आहेत. तसेच त्या स्टार आर्चस अॅकॉडमीच्या संचालिका आहेत. त्यांनी  आतापर्यंत अनेक  आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय खेळाडू घडविले आहेत.

त्यांच्या या नियुक्ती बद्दल महाराष्ट्र धनुर्विदया संघटनेचे अध्यक्ष अॅड. प्रशांतजी देशपांडे, एशियन आर्चरीचे एकीझिक्यूटिव मेंबर, भारतीय व महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे महासचिव श्री प्रमोद चांदूरकर, पिंपरी चिंचवड धनुर्विदया संघटनेचे अध्यक्ष श्री सुभाष मंत्री , एल्पो इंटरनॅशनल स्कूलच्या डायरेक्टर प्रिंसिपल अमृता वोरा व संघटनेचे इतर पदाधिकारी, खेळाडू व पालकवर्ग यांनी अभिनंदन केले आणि त्यांच्या या नवीन जबाबदरीस शुभेच्छा दिल्या.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!