Google Ad
Editor Choice

भिर्रर्रर्रर्र …. पिंपरी चिंचवडमध्ये बैलगाडा शर्यत विजेत्यांवर बक्षिसांची खैरात …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३१ मे) : चिंचवडमध्ये बैलगाडा शर्यत विजेत्यांवर बक्षिसांची खैरात! पाहून तुमचेही डोळे फिरतील, चिखली टाळगाव घाटात गेल्या 5 दिवसात तब्बल 1200 गाडे धावल्याचे उघड होत आहे. तर येथे तब्बल तब्बल दीड कोटींची बक्षीसांची खैरात करण्याचेही समोर आले आहे. त्यामुळे ही बैलगाडा शर्यत भरघोस बक्षिसामुळे चर्चत आली आहे. त्यामध्ये अठ्ठावीस लाखांचा जेसीबी, बारा लाखांची बोलेरो, अकरा लाखांचे तीन ट्रॅक्टर, साडे तीन लाखांच्या दोन बुलेट अन 80 लाखांच्या 114 दुचाकी यांचा समावेश होता.

चिखली टाळगावमध्ये भरलेली बैलगाडा शर्यतीला पुण्यासह अजूबाजूच्या बैलगाडा शर्यत शौकीनांनी हजेरी लावली. तसेच राज्यातील अनेक राजकीय दिग्गजांनी ही आपली उपस्थिती लावत मैदान मारले. या बैलगाडा शर्यतीत राजकीय नेत्यांनी जोरदार राजकीय फटके बाजी केली त्यामुळे ही बैलगाडा शर्यत राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे. यावेळी मुळशी पॅटर्न चित्रपटातील बैल कधी एकटा येत नाही तो जोडीनं येतो आणि नांगरासकट येतो हा डायलॉग विरोधी पक्षनेते देंवेद्र फडणवीसांनी मारत मैदान मारले. त्यामुळे ही बैलगाडा शर्यत होती की राजकीय शर्यत असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर हाच प्रश्न अनेकांना बक्षिसामुळे पडला आहे. चिखली टाळगावमध्ये भरलेली बैलगाडा शर्यत ही भरघोस बक्षिसामुळे चर्चत आली होती. गेल्या 5 दिवसात तब्बल 1200 गाडे हे घाटात धावले आहेत. ज्यात तब्बल दीड कोटींची बक्षीस होती.

Google Ad

चिखली टाळगाव घाटात गेल्या 5 दिवसात तब्बल 1200 गाडे धावल्याचे उघड होत आहे. तर येथे तब्बल तब्बल दीड कोटींची बक्षीसांची दिल्याचे समोर आले आहे.यात आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू उधोजक शंकरशेठ जगताप यांनीही एक लाख रुपयांचे बक्षीस दिले. त्यामुळे ही बैलगाडा शर्यत भरघोस बक्षिसामुळे चर्चत आली आहे. त्यामध्ये अठ्ठावीस लाखांचा जेसीबी, बारा लाखांची बोलेरो, अकरा लाखांचे तीन ट्रॅक्टर, साडे तीन लाखांच्या दोन बुलेट अन 80 लाखांच्या 114 दुचाकी यांचा समावेश होता. अखेर आज शेवटच्या दिवशी मावळ तालुक्यातील शेतकरी रामनाथ वारींगे यांच्या बैलगाड्याने 11:22 सेकंद मध्ये हा घाट पार करत पहिला क्रमांक मिळवला तर त्याच पहिल्या क्रमांकामध्ये आणखी चार बैलगाडे 11:22 सेकंद च्या खालोखाल आल्याने त्यांना देखील हे बक्षीस विभागुन देण्यात आलं आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!