Google Ad
Editor Choice Pune District

Maval : रविवारी ३० ऑगस्ट सकाळी नऊ वाजल्या पासून पवना धरणातून तीन हजार क्युसेकने विसर्ग होणार … नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणाऱ्या पवना धरण परिसरात संततधार पाऊस सुरूच असून धरणात ९६ टक्के पाणीसाठा झाला आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास धरण लवकरच शंभर टक्के भरणार असून धरणातून रविवारी ( ३० ऑगस्ट ) सकाळी ९.०० वाजले पासून तीन हजार कयुसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. यामुळे पवना नदी काठावरील गावांनी सतर्क रहावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाचे उपअभियंता अशोक शेटे यांनी केले आहे.

पावसाळा सुरू झाल्यानंतर सुरूवातीचे दोन महिने पावसाने ओढ दिल्याने मावळातील धरणे भरतील का नाही? अशी शंका असताना ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसाने पवना धरण ९६ टक्के भरले आहे. लवकरच धरण शंभर टक्के भरणार असल्याने पाणी नदीपात्रात सोडण्यात येईल. यामुळे नदी पात्रालगत असलेल्या गावांनी खबरदारी घ्यावी. सर्व नागरिकांनी सतर्क रहावे. नदी तीरावरील सर्व साधनसामुग्री, वाहने व जनावरे सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे. जेणेकरून कुठल्याही प्रकारची हानी हाेणार नाही याची काळजी घेण्यात यावी व जलसंपदा विभागास सहकार्य करावे, असे आवाहन शेटे यांनी केले आहे.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

135 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!