Google Ad
Editor Choice

सर्व गड – किल्ले इस्लामी अतिक्रमणमुक्त व्हायलाच हवेत … हिंदु जनजागृती समिती

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.११ जानेवारी) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर नुकतेच काही धर्मांध मुसलमानांनी अनधिकृत प्रार्थनास्थळ निर्माण केले होते . जागृत हिंदूंनी आवाज उठवल्यानंतर ते हटवण्यात आले ; मात्र अशाच प्रकारचे अनधिकृत बांधकाम छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे मुख्य केंद्र असलेल्या ‘ कुलाबा किल्ल्या ‘ वर देखील झाल्याचे उघड झाले आहे .

Google Ad

या किल्ल्यावर अनधिकृत मजार उभारण्यात आली असून तिला पांढर्‍या रंग देण्यात आला आहे . अशा छोट्या अनधिकृत मजारींचे रुपांतर नंतर दर्ग्यात आणि पुढे जाऊन मशिदींमध्ये केले जाते . बेकायदेशीर बांधकामांद्वारे हे भूमी हडपण्याचे एक तंत्र असून हे बांधकाम तात्काळ हटवावे आणि संबधितांवर तत्काळ गुन्हे दाखल करावेत , अशी मागणी ‘ हिंदु जनजागृती समिती ‘ आणि ‘ राजे प्रतिष्ठान दुर्ग संवर्धन विभाग ‘ यांनी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण मुंबई विभाग , तसेच मुंबई आणि रायगड जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून केली आहे . या वेळी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या साहाय्यक पुरातत्त्व शास्त्रज्ञ श्रीमती फाल्गुनी काटकर यांनी कुलाबा किल्ल्यावर आमचे अधिकारी जाऊन आले असून ते दोषींवर योग्य ती कारवाई करणार आहेत , असे आश्‍वासन दिले .

या वेळी भारतीय पुरातत्त्व विभागात समितीचे मुंबई जिल्हा समन्वयक श्री . बळवंत पाठक , राजे प्रतिष्ठान दुर्ग संवर्धन विभागाचे मुंबई अध्यक्ष श्री . रोशन जंगम – बेलसेकर आणि श्री . राहुल आस्कट यांनी , तर मुंबईचे जिल्हाधिकारी श्री . राजीव निवतकर आणि रायगडच्या उपजिल्हाधिकारी श्रीमती स्नेहा उबाळे यांना समितीचे सर्वश्री सतीश सोनार , मंजुनाथ पुजारी , सौ . विशाखा आठवले , अवधूत बने , गिरीश जोशी आणि उदय तेली यांनी निवेदन दिले .

कुलाबा किल्ल्यांवरील अतिक्रमणाविषयी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज श्री . रघुजीराजे आंग्रे यांनी काही दिवसांपूर्वीच तक्रार दाखल केली होती . या संदर्भात हिंदु जनजागृती समितीने ज्या अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे हे घडले , त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ; तसेच राज्यातील सर्वच किल्ल्यांच्या ठिकाणी अशी अतिक्रमणे झाली आहेत का , याचा अहवाल शासनाला सादर करून ती अतिक्रमणे तत्काळ हटवण्याची प्रक्रिया चालू करावी , अशी मागणी केली . पुरातत्व खाते आणि प्रशासन यांनी हे अतिक्रमण न हटवल्यास हिंदु जनजागृती समिती या प्रकरणी राज्यभरात तीव्र आंदोलन छेडेल , अशी चेतावणीही समितीने दिली आहे .

हिंदवी स्वराज्याचा कणा असलेले हे शेकडो गड – किल्ले राज्याचा ऐतिहासिक ठेवा आहे . असे असतांना अनेक किल्ल्यांवर धर्मांधांनी अनधिकृत बांधकामे , मजार , प्रार्थनास्थळे उभी करून किल्ल्यांचे इस्लामीकरण करण्याचा घाट घातला आहे . छत्रपती शिवरायांनी राज्यातील पाच इस्लामी पातशाह्यांना संपवले , तरी इस्लामी आक्रमणे आजही थांबलेली नाहीत . राज्यातील सर्व गडकोट इस्लामी आक्रमणमुक्त व्हायलाच हवेत , असेही हिंदु जनजागृती समितीने म्हटले आहे .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!