Google Ad
Editor Choice

चिंचवड व परिसरातील मुले आणि नागरिक लसीकरण पासून राहतायेत वंचीत … घरापासून जवळ सोय करण्याची भाजपा शहर सचिव:मधुकर बच्चे यांनी केली मागणी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१२ जानेवारी) : जानेवारी २०२२ पासून १५ ते १८ वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंध कोवॅक्सिन लसीकरण सुरू करण्यात आले आहे.परंतु चिंचवड व परिसरातील नागरिकांना प्रेम लोक पार्क येथे लसीकरण केंद्र केले आहे ते खूपच अडचणीचे ठरत आहे त्यामुळे अनेक मुलांना लसीकरण पासून वंचीत राहावे लागत आहे.

चिंचवड परिसरातील व अन्य भागातील नागरिकांना लसीकरणसाठी तालेरा हॉस्पिटल हेच योग्य आहे. तालेरा हॉस्पिटल हे दळणवळण व माहितीच्या दृष्टीने सर्वांना परिचित आहे तर प्रेम लोक पार्क हे दळणवळण व माहितीच्या दृष्टीने अडचणीचे आहे. त्यामुळे लसीकरण साठी आवश्यक तेवढा प्रतिसादहि मिळत नाही.

Google Ad

१५ ते १८ वयोगटातील लसीकरण केंद्र तालेरा हॉस्पिटल चिंचवड येथेच झाले पाहिजे या मागणीसाठी महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य व भाजपा शहर सचिव:मधुकर बच्चे यांच्या वतीने तालेरा हॉस्पिटल मुख्य वैध्यकीय अधिकारी सौ.संगीता तिरुमनी मॅडम यांना भेटून सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात आले.

वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा करून तालेरा हॉस्पिटल येथे किंवा अन्य जवळील ठिकाणी १५ ते १८ वयोगटातील मुलांना लसीकरण केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल असे वैदयकीय अधिकारी तिरुमनी मॅडम यांनी बच्चे यांना आश्वासन दिले यासाठी मधुकर बच्चे यांच्याकडून पाठपुरावा केला जाईल.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!