Google Ad
Editor Choice

रविवारी पवनेच्या तीरावर घुमणार किर्तनाचे स्वर … कासारवाडीतील श्री दत्त साई सेवा कुंज आश्रमात दत्त जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!

॥ नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा ।।

।। वृक्ष वल्ली आम्हां सोयरे वनचरे ।।

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.११ डिसेंबर) : मिती मार्गशीर्ष शु . ९ शके १९४३ . रविवार दि . १२/१२/२०२१ ते १९ / १२ / २०२१ श्री दत्तजयंती निमित्त निसर्गरम्य पवना पावन गंगेच्या तिरी अवघी दुमदुमली पंढरी महाराष्ट्र ही संताची भूमी आहे. संतानी दिलेल्या उपदेशाचा आजही प्रभाव समाजात आहे . त्यामुळे आजही मातृभुमीच्या कानाकोपऱ्यात टाळ व मृदुंगाच्या गजरात किर्तनादी कार्यक्रमाचे आयोजन होते .

“आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी” या न्यायाने साधु संताचा अवतार दिन जनाच्या उद्दारासाठी असतो त्यास्तव – अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे . तरी सर्व भाविक भक्तांनी या किर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा ही सविनय विनंती श्री दत्त-साईसेवा कुंज आश्रमच्या वतीने करण्यात आली आहे . यावेळी सर्व भाविकांनी कोरोना नियमांचे पालन करावे .

Google Ad

रविवार १२/१२/२१ रोजी सकाळी ०९ .०० वा. मा . आमदार श्री . लक्ष्मणभाऊ पांडुरंग जगताप ( चिंचवड ), मा . सौ . उषाताई ( माई ) ढोरे ( महापौर , पिं.चिं . मनपा ), मा . आमदार श्री . महेशदादा लांडगे ( भोसरी ) श्री विलासशेठ विठोबा लांडे ( माजी आमदार , भोसरी ), मा . सौ . अश्विनीताई लक्ष्मण जगताप, श्री . नामदेव ढाके ( सत्तारुढ पक्षनेते . पिं.चि. मनपा ) मा . श्री . हनुमंतराव गायकवाड ( बी.व्ही.जी. ग्रुप चेअरमन ) मा . श्री . शत्रुघ्नु ( बापू ) काटे ( नगरसेवक . पिं.चिं . मनपा) यांच्या शुभहस्ते होणार आहे.

कार्यक्रम स्थळ :-
श्री दत्त साई सेवा कुंज आश्रम कासारवाडी पुणे -३४ किर्तन वेळ सायं . ०७.०० वा.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!