Google Ad
Editor Choice

आमदार अण्णा बनसोडे यांचे आयुक्तांना निवेदन … महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत महापालिकेद्वारे साहित्या खरेदी, पुरवठा करण्याबाबत सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि .९ डिसेंबर) :पिंपरी  चिंचवड महापालिकेतील मनपा मध्यवर्ती भांडार विभागामार्फत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत सामाविष्ट रुग्ण व इतर रुग्णांकरिता शस्त्रक्रिया किंवा इतर उपचाराकरिता लागणारे इम्प्लांट साहित्य दर करार पद्धतीने खरेदी / पुरवठा करणेसाठी ६,९८,६३,७५०/-रुपये किमतीची निविदा प्रसिद्ध केली असून या निविदा अटी शर्तीमध्ये हेतुपुरस्कर विशिष्ट कंपन्यांना डोळ्यासमोर ठेवून विशिष्ट अटी शर्तींचा समावेश या निविदेमध्ये भांडार विभागाने केला आहे. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कायदेशीर कारवाई होईपर्यंत सदर निविदा स्थगित करणे आवश्यक आहे. अशा आशयाने निवदेन महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी दिले आहे.

सदर निवेदनात म्हटले आहे की, सदर निविदेतील वैद्यकीय साहित्य हे ६,९८,६३,७५०/- इतकी अंदाजित रक्कम दर्शविण्यात आलेली आहे.निविदा अट शर्त क्रमांक 8 नुसार राज्यातील कोणतीही मोठी शासकीय/ निमशासकीय वैद्यकीय संस्था अशा विशिष्ट अटी शर्ती टाकून खरेदीखत करताना दिसून येत नाही. याचा अर्थ विशिष्ट ठेकेदारांना किंवा पुरवठादारांना डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारचा अटी शर्ती तयार करण्याचा घाट महापालिका भांडार विभागांनी केलेला दिसून येतो. सदर ६,९८,६३,७५०/-रुपये खर्चाच्या निविदा रकमे मधील अट क्रमांक 8 मध्ये बदल केल्यास ही निविदा २ कोटी रुपयांवर येईल आणि मनपाचे सुमारे ४ कोटी रुपये बचत होतील. म्हणून वस्तुस्थिती पडताळणी होणे आवश्यकआहे.याच बरोबर ज्या योजनेतील रुग्णांवर उपचारासाठी हे साहित्य वापरले जाणार आहे.

Google Ad

त्या योजनेतील रुग्णाला राज्य शासनाकडून होणारा खर्च अदा करण्यात येत असतो. त्याच योजनेसाठी महापालिका पुन्हा कोटी रुपयांवर खर्च करून निविदा काढण्याचा नेमका हेतू काय ? याचा ही उलट टपाली अहवाल द्यावा. तरी, सदर ई-निविदा तात्काळ स्थगित करून निविदा अटी शर्ती मधील घोळ नेमका का ? व कोणी केला? याबाबत चौकशी समिती नेमून तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी आमदार बनसोडे यांनी आयुक्त राजेश पाटील यांना केली .

सदर निविदा अटी व शर्तीमध्ये अट क्रमांक 4 F व 4 G मध्ये निविदा धारकाने मागील तीन वर्षाची उलाढाल 30% असल्याबाबत सनदी लेखापाल कडून प्रमाणपत्र आवश्यक असल्याचा उल्लेख आहे. तसेच निविदा दर पत्रक सादर करणारे निवेदन धारकाने निविदा रकमेचे किमान 30% रक्कम इतके इम्प्लांट साहित्य शासकीय-निमशासकीय रुग्णालयांना पुरवठा केल्याच्या प्रमाणपत्राची मागणी केली आहे.

यासह निविदा आठ शर्त क्रमांक 8 मध्ये निविदा धारकाकडून ‘पुरविण्यात येणारे इम्प्लांट साहित्य निविदेतील स्पेसिफिकेशन नुसार आवश्यक असून USFDA व European CE या दर्जाचीच असणे व तसेच प्रत्येक साहित्यावर Item code नमूद असणे आवश्यक राहील’ अशी अट टाकण्यात आलेली आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!