Google Ad
Editor Choice

या दिवशी करा निवडणूक ओळखपत्रास आधार जोडणी … २०७ भोसरी विधानसभा मतदार संघातील सर्व ४१८ मतदान केंद्रावर अशी होईल नोंदणी?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८ सप्टेंबर) : भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी यांचे निर्देशानुसार मतदारांकडून निवडणूक ओळखपत्रास आधार जोडणी करणे करिता २०७ भोसरी विधानसभा मतदार संघातील सर्व ४१८ मतदान केंद्रावर दि.११/०९/२०२२, रविवार रोजी ऐच्छिक तत्वावर निवडणूक ओळखपत्रास आधार जोडणी करिता विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये सर्व मतदारांनी सहभागी व्हावे व निवडणूक ओळखपत्रास आधार जोडणी करुन घ्यावे, असे आवाहन २०७ भोसरी विधानसभा मतदार संघाचे उपजिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी डॉ.राणी ताटे यांनी केले.

२०७ भोसरी विधानसभा मतदार संघाचे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी अण्णा बोदडे, क्षेत्रीय अधिकारी क क्षेत्रीय कार्यालय, राजेश आगळे, क्षेत्रीय अधिकारी इ क्षेत्रीय कार्यालय व सिताराम बहुरे, क्षेत्रीय अधिकारी फ़ क्षेत्रीय कार्यालय तसेच सुरेश पिसाळ, नायब तहसिलदार , पांडुरंग पवार , तहसिलदार व गीता गायकवाड, अप्पर तहसिलदार यांची आज दि.०८/०९/२०२२ रोजी बैठक संपन्न झाली.

Google Ad

२०७ भोसरी विधानसभा मतदार संघात एकूण ४१८ मतदान केंद्र आहेत. या ठिकाणी व मतदार नोंदणी कार्यालय,राजीव गांधी माध्यमिक विद्यालय, नवीन इमारत पहिला मजला, नेहरुनगर या ठिकाणी दि.११/०९/२०२२, रविवार रोजी ऐच्छिक तत्वावर सकाळी १०.०० ते सायं.०६.०० या वेळेत ऐच्छिक तत्वावर आयोजन करण्यात आले असून त्या ठिकाणी बी.एल.ओ. उपस्थित राहून मतदारांचे निवडणूक ओळखपत्रास आधार जोडणी करुन देणार आहेत. तसेचhttp://nvsp.in  किंवा http://voterportal.eci.gov.in किंवा Voter Helpline App या माध्यमाद्वारे मतदारांना निवडणूक ओळखपत्रास आधार जोडणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!