Google Ad
Editor Choice Maharashtra

राज्यातील लॉक डाऊनला विरोध करत, वंचित बहुजन आघाडीचे १२ ऑगस्टला ‘ डफली बजाव ‘ आंदोलन!

महाराष्ट्र 14 न्यूज : केंद्र व राज्य सरकारकडून लाॅकडाऊन उठविण्याची कसलीही चिन्हं दिसत नाहीत. तसेच याकाळात नागरिकांना कसलीही सवलत द्यायलाही सरकार तयार नाही. यामुळे कामगारांची उपासमार अन् नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचं पहायला मिळतंय. याविरोधात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकरांनी ‘डफली बजाव’ आंदोलनाचा इशारा दिला आहे.

राज्यात एसटी सेवा बंद असल्यानं कामगारांची उपासमार होत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही पुरती कोलमडलेली आहे. या बससेवा तात्काळ सुरू करण्यात याव्यात या प्रमुख मागणीला घेऊन राज्यातील एसटी डेपो व शहरातील सार्वजनिक बस डेपोसमोर दिवसभर डफडं वाजवून आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली. तसेच या आंदोलनात राज्यभरातील बाजार समिती, व्यापारी, रिक्षा, दुकानदार, फेरीवाले, लोहार, न्हावी, चांभार या संघटनांनीही सहभागी व्हावं, असंही आवाहन आंबेडकर यांनी यावेळेस केलं आहे.

Google Ad

दरम्यान लाॅकडाऊनला विरोध करण्याचा पवित्रा वंचित बहुजन आघाडीनं का घेतला आहे, हेदेखील या आंदोलनातून नागरिकांना पटवून देण्यात येणार असल्याची माहिती आंबेडकरांनी यावेळेस दिली. लाॅकडाऊनच्या काळात मजूर अन् कामगार वर्गाला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्यानं वंचित बहुजन आघाडी आता मैदानात उतरली असल्याचं पहायला मिळतं आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

11 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!