Google Ad
Editor Choice india

Delhi : वीज वितरण कंपन्यांना मदत ‘ पॅकेज ‘ अंतर्गत महाराष्ट्राला तब्बल पाच हजार कोटी रूपये!

महाराष्ट्र 14 न्यूज : वीज वितरण कंपन्यांना मदत पॅकेजमध्ये घोषित केलेल्या 90 हजार कोटी रूपयांपैकी 68 हजार कोटींचे कर्ज जारी झाले आहे. यानंतर आता डिस्कॉम्सला दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मे महिन्यात मदत पॅकेजची घोषणा करताना म्हटले होते की, रोकडची कमतरता भासत असलेल्या डिस्कॉम्समध्ये 90 हजार कोटी रुपयांचे लिक्विडिटी इन्फ्यूज करण्यात येईल.

एका सूत्रांनुसार, सरकारी नॉन-बँकिंग अर्थ कंपनी आरईसी लिमिटेड आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनने आतापर्यंत वीज वितरण कंपन्यांना 68 हजार कोटी रुपयांचे लोन जारी केले आहे. मागच्या आठवड्यातच आरईसी लिमिटेडने एका एक्सचेंजमध्ये म्हटले होते की, कंपनीने 31 जुलै 2020पर्यंत 30 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जारी केली आहे

Google Ad

ती डिस्कॉम्ससाठी लिक्विडिटी इन्फ्यूजनचाच भाग आहे. या पॅकेज अंतर्गत डिस्कॉम्सला देण्यात येणारे लोन वरील दोन्ही एनबीएफसी समान प्रमाणात फंड करतील. हे दोन हप्त्यात जारी करण्यात येईल. 13 मे रोजी डिस्कॉम्सच्यासाठी 90 हजार कोटी रुपयांच्या या पॅकेजची घोषणा केली होती.

तमिळनाडु आणि बिहारने सबमिट केला नाही औपचारिक प्रस्ताव  , सूत्रांनी सांगितले की, क्रेडिटचा पहिला हप्ता आंध्र प्रदेश, तेलंगना आणि उत्तर प्रदेशला जारी केला आहे. 90 हजार कोटी रूपयांचे हे पॅकेज तेव्हा पूर्ण होईल, जेव्हा 20 हजार कोटी रूपये तमिळनाडु आणि 3500 कोटी रुपयांसाठी बिहार औपचारिक दृष्ट्या आपला प्रस्ताव सबमिट करतील.

कोणत्या राज्यांना किती रक्कम मिळाली :-
या पॅकेज अंतर्गत सर्वात जास्त के्रडिट उत्तर प्रदेशला मिळाले आहे, जे आतापर्यंत 20 हजार कोटी रूपये आहे. दुसर्‍या नंबरवर 12,000 कोटी रूपयांसोबत तेलंगना, 7,000 कोटी रुपये कनार्टक, 6,000 कोटी रुपये आंध्र प्रदेश, 5,000 कोटी रुपये महाराष्ट्र आणि पंजाब, राजस्थान आणि जम्मू व कश्मीरला प्रत्येकी 4,000 कोटी रूपये.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

3 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!