Google Ad
Editor Choice

सांगवी मध्ये सारिका भंडलकर यांच्या वतीने खेळ रंगला भोंडल्याचाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ ऑक्टोबर)  : सध्या सर्वत्र नवरात्रीचा आनंदोत्सव सुरू आहे. स्त्रीशक्तीचा जागर सुरू असताना बाहेर सर्वत्र प्रत्येक दिवशी विविध रंगांच्या साड्या, भोंडला ,दांडिया अशा आनंदात मग्न आहेत. सांगवीतील डोनेट एड सोसायटीच्या अध्यक्षा सारिका कृष्णा भंडलकर यांच्या वतीने शिवसृष्टी उद्यान जुनी सांगवी या ठिकाणी आयोजित भोंडल्यामध्ये महिलांनी उत्साहपूर्ण वातावरणामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन पारंपरिक भोंडल्याची गाणी व नृत्याचा आनंद घेतला.

वरात्र म्हटले की सर्वत्र एक चैतन्यमयी आणि उत्साहवर्धक पावित्र्य असे वातावरण होत आणि नवरात्र म्हटलं की आठवण येते ती भोंडल्याची ज्याला भुलाबाई किंवा हादगा असे ही म्हणतात. यावेळी उपस्थित महिलांनी गायन, कविता वाचन, नृत्य अशा विविध कलागुणांचे सादरीकरणही केले. तसेच वेगवेगळ्या दांडिया गरबाच्या ग्रुपने खिरापत बनवून आणली होती व ती खिरापत ओळखण्याचा कार्यक्रमही घेण्यात आला. अशा प्रकारचे उपक्रम व्हायला हवेत, जेणेकरून महिलांच्या कलागुणांना वाव मिळेल. तसेच त्यांना एक व्यासपीठ हक्काचे व्यासपीठ निर्माण करून दिल्याबद्दल सर्व सहभागी महिलांनी भंडलकर यांचे कौतुक केले. यावेळी उपस्थित सर्व महिलांच्या आनंदित मुद्रा महाभोंडल्याचा यशस्वीतेची साक्ष देत होत्या.

Google Ad

या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी डोनेट एड सोसायटीच्या संगीता प्रधान,ऋतुजा धर्माधिकारी, कांचन खरात, मयुरा खटके,आम्रपाली बनसोडे,ममता गायकवाड शोभा बलभीम माने,शीतल शिलवंत,चैत्राली कुलकर्णी यांनी सहकार्य केले.

यावेळी बोलताना आयोजक सारिका भांडलकर म्हणाल्या, “आपल्या महाराष्ट्राची पारंपरिक संस्कृतीची जोपासना करणारा हा आनंददायी सण म्हणजे भोंडला सर्वानीच साजरा केला पाहिजे. आता हा सण घरघुती नसून सामाजिक स्वरूपात साजरा करतात. बऱ्याचशा सामाजिक संस्था देखील महिला मुलींसाठी मोठ्या प्रमाणात भोंडल्याचा आयोजन करतात आणि आपली परंपरा जपण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच चला तर मग आपण देखील भोंडला करून आपल्या संस्कृतीची जोपासना करावी हा आमचा उद्देश आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!