Google Ad
Editor Choice

पिंपळे गुरव, पिंपळे निलख आणि जुनी सांगवी बरोबरच पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी निमित्ताने शस्त्र पूजन उत्सव साजरा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ ऑक्टोबर) : पिंपळे गुरव, पिंपळे निलख – जुनी सांगवी बरोबर च पिंपरी चिंचवड शहरात येथे मोठ्या उत्साहात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजया दशमी निमित्ताने शस्त्र पूजन उत्सव साजरा करण्यात आला.  पिंपळे गुरव येथील  रामकृष्ण मंगल कार्यालय आणि नवी सांगवीतील न्यू मिलेनियम इंग्लिश स्कूल मैदानावर तसेच पिंपळे निलख चोंधे पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स , डीपी रोड , विशाल नगर येथे शस्त्र पूजन करण्यात आले.

यावेळी सांगवी येथे प्रमुख वक्ते म्हणून पश्चिम महाराष्ट्र प्रांत परियोजना सहप्रमुख निलेश लाळे यांनी उपस्थितांना संघकार्याची माहीती दिली. प्रमुख पाहूणे म्हणून सांगवी गावठाण मारूती मंदिर ट्रस्ट समितीचे अध्यक्ष अशोक सुदामा ढोरे उपस्थित होते. तर पिंपळे गुरव येथे प्रमुख पाहुणे म्हणून ह भ प काटे महाराज तसेच भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणुक प्रमुख शंकर जगताप, माजी स्वीकृत नगरसेवक महेश जगताप उपस्थित होते. तर पिंपळे निलख विशाल नगर येथे प्रमुख अतिथी हरिष पाठक उपस्थित होते. यावेळी घोषवादन,घोष संचलन,कवायती प्रात्यक्षिकांचे स्वयंसेवकांनी सादरिकरण केले.

Google Ad

सांगवी नगर कार्यवाह संजय लोहकरे, मनोज ठाकूर, शुभम बोपिंनवार, जतिनजी गाजरे, रुपेश कोडिलकर, तेजस साबळे, घोष प्रमुख ऋषिकेश मिराशी, विजय गोयांका समीर देशमुख, संकेत कुलकर्णी आदी स्वयंसेवकांनी उत्सवाचे संयोजन केले.

पिंपळे निलख विशाल नगर येथे यावेळी प्रमुख वक्ते सुधीर गाडे ( प्रोफेसर – इलेक्ट्रॉनिक्स , आबासाहेब गरवारे कॉलेज ) महानगर बौद्धिक प्रमुख , प्रांत बौद्धिक मंडळ सदस्य हे होते. तर पिंपळे निलख येथे कार्यवाह अंशुमन लाठ यांनी संयोजन केले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement