महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि.०१ ऑक्टोबर) : दि. ०१ ऑक्टोबर २०२२ रोजी जिल्हा रुग्णालय औंध, पुणे येथे राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत (NCD) राष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमाच्या (NPHCE) अंतर्गत जागतिक जेष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे यांनी ग्रहण केले.
यावेळी जेष्ठ नागरिकांनी कशाप्रकारे आरोग्याची काळजी घ्यावी यावर डॉ. अनिल बिऱ्हाडे (अस्थिरोग तज्ञ) उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर डॉ. नेहा कोडे (मानसोपचारतज्ञ) यांनी वृद्धापकाळात येणाऱ्या मानसिक समस्या काय आहेत आणि त्यावर कश्याप्रकारे उपचार घेतला जाऊ शकतो याबद्दल मार्गदशन केले. सोबतच डॉ. प्रकाश रोकडे (नेत्र शल्यचिकित्सक) आणि डॉ. प्रियांका घुटे (भौतिकोपचारतज्ञ) यांनी मार्गदर्शन केले. डॉ. वर्षा डोईफोडे यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये जिल्हा रुग्णालय येथे उपलब्ध असलेल्या जेष्ठ नागरिकांसाठी सुविधांबद्दल माहिती देवून उपस्थितांना आवाहन केले कि सर्वांनी या सुविधांचा जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा.

सदर कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन डॉ. वैशाली आमटे, जिल्हा कार्यक्रम समन्वयक, श्री. हनुमान हाडे, चिकित्सा मानसशास्त्रज्ञ, श्री. मोमीन शेख, समुपदेशक, श्री. मिलिंद कारंजकर, चिकित्सा मानसशास्त्रज्ञ, श्रीमती. अरुणा कावरे, समुपदेशक, श्री. पराग वासनिक, दंत तंत्रज्ञ यांनी केले. डॉ. प्रियांका घुटे यांनी सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचा शेवट उपस्थित सर्व जेष्ठ नागरिकांना फलाहार देवून करण्यात आला.कृपया आपले दैनिकांत प्रसिद्धी देणेस विनंती . अधिक माहिती करीता संपर्क डॅा वैशाली आमटे समन्वयक असंसर्गिक आजार नियंत्रण कार्यक्रम मो नं 84462 92078