Google Ad
Editor Choice

ब्रम्ह चैतन्य योग परिवाराच्या वतीने … योगातून अध्यात्मिकतेची जोड देत रंगले महिलांचे आगळेवेगळे मंगळागौर पुजन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२९ ऑगस्ट) : श्रावण महिन्यात महिला पारंपरिक खेळ खेळत असतात, असाच मंगळागौरचा खेळ ब्रम्ह चैतन्य योग परिवार यांच्या वतीने घेण्यात आला.  भारतीय संस्कृती ची, ऋषिमुनींची योगसाधना अतिशय जुनी परंपरा यावर आधारित , सणासमारंभांची, व्रतवैकल्य यांची परंपरा आणि यालाच दिलेली शारिरीक,मानसिक,सामाजिक आरोग्याची जोड…म्हणुनच श्र्रावण ,भाद्रपद महिन्यात,ॠतुंना अनुसरुन ऊपवास ,विशिष्ट खानपान पद्धती ,शेतात ऊगवणारे धान्य,फळ,भाज्या, सर्वच कस सृष्टी निर्मात्याने अचुक कमालीची निर्मीती करुन ठेवली आहे.

श्र्रावणात येणाऱ्या सणांसोबत येणारे पारंपारिक खेळ पंचमीला झीम्मा, फुगडी,झोका,पारंब्यांना पकडुन झोका इत्यादी. तसेच मंगळागौर पुजनाचेही त्याला दिलेली अध्यात्मिक जोड ज्यामुळे मानसिक आरोग्य कसे ऊत्तम राखता येईल,शारिरीक आरोग्याची काळजी या खेळांमुळे घेतली जाते,स्त्रीयांच्या शरिराला व्यायाम व्ह्वा ही एकविचारसरणी त्यामागे दडली आहे.
ब्रम्ह चैतन्य योग परिवार गेले 12 वर्ष हे काम मेघा झणझणे, मीना पवार या दोघी योग शिक्षिका करत आहेत. वेगवेगळे पारंपारीक संस्कृतीला धरुन ,मनोरंजनात्मक आरोग्य दक्ष खेळ व कार्यक्रम आयोजित केले जातात.

Google Ad

या वेळी ही मंगळागौरीचे औचित्य साधून खेळांचे आयोजन केले गेले. यात महिलां च्या कलागुणांना भरभरुन वाव दिला गेला.अशाच एक योग साधक अर्चना सुतार ऊत्तम गात असल्या मुळे, निवेदन व गाण्यांची जबाबदारी सोपवण्यात आली होती, मंगळागौरी ची विशिषट गाणी, लावणी व निवेदन करुन कार्यक्रमाला रंगत आणली. या त सर्व महिलांनी नऊवारी परिधान करुन साजेसा साज श्रृगार करुन फेर धरला, फुगडी, काठवट कणा, कंबरमोड, झीम्मा असे खेळ खेळल्या, खुप ऊत्साह सर्वांना मधे होता. या उपक्रमात महिलांनी हिरवी साडी व नथ परिधान करून पारंपरिक वेशभूषेत सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद लुटला. यावेळी महिलांकडून शंकराच्या पिंडीचे सामूहिक पूजन, झिम्मा, फुगडी, उखाणे, महिलांचे खेळ, नाचून गाऊन आपला आनंद व्यक्त केला.

याचे संपुर्ण श्र्रेय मीना व मेघा यांना जाते, कारण व्यायामाचे योग प्रकाराचे शारिरीक मानसिक ऊत्तम आरोग्य राखण्याचे धडे या दोघी नि:शुल्क घेत असतात.अगदी धुणी भांडी करणार्या कामवाली बाई पासुन ते डाॅ, डाॅक्टरेट,CID, पोलीस, प्रोफेसर, नौकरी करणारे,व्यवसाय करणारे,शिक्षण घेत असलेले विद्यार्थी यांचा समावेश या वर्गात असतो.

बारा वर्षांपूर्वी आठ ते दहा विद्यार्थ्यांपासून केलेली ही सुरुवात आज सर्व दूर आज सातासमुद्रा पलीकडे पसरली आहे कोविड काळात ऑनलाइन पद्धतीने देखील हे काम उत्साहात सुरू होते आज तब्बल हजार ते बाराशे पर्यंत आकडा पोहोचला आहे मीना व मेघा कायमच नवनवीन प्रकार शिकून नॅशनल व इंटरनॅशनल कोर्सेस करून अद्यावत प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देत असतात त्याचप्रमाणे पारंपारिक खेळ कार्यक्रमाचे आयोजन करून महिलांमध्ये गोडी कशी टिकून राहील या विचारानेच या खेळांचे व कार्यक्रमाचे आयोजन केले जाते एकविसाव्या शतकाकडे आधुनिक तंत्र तंत्रज्ञानाकडे झुकत चाललेली आजची पिढी फक्त तंत्रज्ञानात अडकून पडू नये नैसर्गिक व सर्वांगीण भारतीय परंपरेची जाणीव त्यांना व्हावी म्हणून प्राचीन योग परंपरेचे महत्व या पिढीला देऊन ही परंपरा चालू राहणे आवश्यक नाही तर गरजेची आहे हे पवित्र निर्व्याज काम ब्रह्मचैतन्य योग परिवारात अव्याहात पणे सुरू आहे.

गणेशोत्सवा निमित्ताने कार्यक्रमाचे बुकिंग सुरू, संपर्क :-

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!