Google Ad
Editor Choice Education

सांगवीत सौ. सारिका कृष्णा भंडलकर (अध्यक्ष डोनेटेड सोसायटी सांगवी) यांच्या वतीने … बच्चे कंपनीची रंगली शाडू माती पासून गणपती बनवण्याची कार्यशाळा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२९ ऑगस्ट) : आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्री शंकर जगताप (चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख) आणि माजी महापौर माई ढोरे यांच्या सहकार्याने सौ सारिका कृष्णा भंडलकर (अध्यक्ष डोनेटेड सोसायटी सांगवी) यांनी मुलांमध्ये पर्यावरण पूरक दृष्टिकोन निर्माण व्हावा तसेच त्यांच्यामधील सर्जनशील गुणाची वाढ व्हावी यासाठी शाडू माती पासून गणपती बनवण्याची कार्यशाळा रविवार दिनांक 28/ 8/ 2022 रोजी सकाळी नऊ ते बारा या वेळेमध्ये डॉल्फिन स्कूल सांगवी या ठिकाणी आयोजित केली होती.

या कार्यशाळेसाठी विद्यार्थ्यांना शाडू माती तसेच इतर सर्व साहित्य देण्यात आले .तसेच प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला प्रशस्तीपत्रकही देण्यात आले.सांगवी परिसरातील सुमारे 322 विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदवून आपल्या सर्जनशील कलागुणांना वाव दिला. तसेच मुलांनी घरी जाऊन या गणेश मूर्तींना रंगवून, सजवून त्याचे फोटो आयोजकांना पाठवायचे आहेत या मधून उत्कृष्ट गणेश मूर्तींना आकर्षक प्रोत्साहन पर बक्षीसही देण्यात येणार आहेत.

Google Ad

या कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री शंकर जगताप तसेच माजी महापौर माई ढोरे यांच्याबरोबर हर्षल ढोरे सागर आंघोळकर राजेश सोमवंशी, धनंजय ढोरे ,संतोष ढोरे ,जवाहर ढोरे आदी मान्यवरांनी आपला उपस्थिती दर्शवली. मुलांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी पर्यावरण पूरक उपक्रम राबवले पाहिजेत तसेच लहानपणापासून मुलांमध्ये या गुणांना प्रोत्साहन दिल्यास सुजाण भावी पिढी निर्माण होईल जी पर्यावरणाची जपणूक करेल असेही श्री शंकर शेठ जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त करताना यावेळी नमूद केले.

तसेच आदरणीय महापौर माई ढोरे यांनी या उपक्रमाला शुभेच्छा देताना अतिशय उत्कृष्ट नियोजन आणि या पर्यावरण पूरक उपक्रमाबद्दल सौ.सारिका कृष्णा भंडलकर यांचे कौतुक केले तसेच सांगवी परिसरातील पालकांनीही मोठ्या प्रमाणात आपल्या मुलांना या ठिकाणी घेऊन येऊन या पर्यावरण पूरक उपक्रमास सहकार्य केल्याबद्दल आयोजकांतर्फे श्री कृष्णा भंडलकर यांनी सर्व मान्यवर तसेच विद्यार्थी, पालक यांचे आभार मानले.या उपक्रमासाठी ज्योती मॅडम, युगेंद्र कातोरे,गणेश औताडे यांनी प्रशिक्षणाचे काम पाहिले.प्रतिमा आदम,शीतल शिलवंत,नाझ शेख,निशा कुंभार,साक्षी वाघमारे,संस्कृती नेटके,कुमुद वाघमारे,मंगल चव्हाण आदींचे सहकार्य लाभले.

गणेशोत्सवा निमित्ताने कार्यक्रमाचे बुकिंग सुरू, संपर्क :-

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement