Google Ad
Editor Choice

आमदार महेश लांडगे यांना नाराज नगरसेवकांचे डॅमेज कंट्रोल रोखण्यात अपयश … भाजप नगरसेवक वसंत बोराटे यांचा नगरसेवक पदाचा राजीनामा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६ फेब्रुवारी) : भोसरी चे आमदार आणि भाजपचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष महेश लांडगे यांच्या मर्जीतील भाजप नगरसेवक वसंत बोराटे यांनी आज बुधवारी (दि. १६) रोजी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्याकडे आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे.

मागील पाच वर्षात मोशी-जाधववाडीतील विविध आरक्षणे ताब्यात घेण्यासाठी शेवटपर्यंत प्रशासकीय ताकद मिळाली नाही. जाधववाडी आणि मोशीतील ग्रीन झोन हे रहिवासी झोन होणे आवश्यक होते. ते झाले नाही. परिणामी, विकास कामांना गती मिळाली नाही.
अपेक्षित कामे झाली नाहीत. त्यामुळे या भागातील नागरिकांसाठी भाजप नगरसेवकपदाचा राजीनामा दिला असल्याचे वसंत बोराटे यांनी सांगितले. लवकरच पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचेही ते म्हणाले.

Google Ad

आमदार महेश लांडगे यांनी नाराज नगरसेवकांचे डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी पुढाकार घेतला असला तरी, त्यात त्यांना यश मिळताना दिसत नाही. आता ही गळती ते कशी रोखणार याकडेच पिंपरी चिंचवड भाजप कार्यकर्त्यांचे  आणि सर्वांचे लक्ष लागले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!