Google Ad
Editor Choice

राष्ट्रवादी काँग्रेस युवती प्रभाग अध्यक्ष मनाली कुटे यांचा खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश*

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ जानेवारी) : राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग क्रमांक ३० युवती अध्यक्ष कु.मनाली कुटे यांच्यासह अनेक युवतीनी आज खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.त्या प्रसंगी पिंपरी-चिंचवड युवासेना अधिकारी विश्वजीत बारणे,पिंपरी युवासेनाप्रमुख निलेश हाके,युवती अधिकारी प्रतीक्षा घुले,व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

त्यावेळी खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ”पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर युवा कार्यकर्त्यांचा मोठा विश्वास आहे. त्यामुळेच युवा कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. युवा सैनिकांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहचवावेत. लोकांमध्ये मिळून काम करावे. त्यांच्या अडी-अडचणींना धावून जावे.

Google Ad

पक्षप्रमुख मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून मी आज शिवसेनेत प्रवेश करत आहे. आदरणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार ८०% समाजकारण २०% राजकारण करत तळागाळापर्यंत काम करण्याचा मानस आहे असे मनाली कुटे यांनी मनोगत व्यक्त केले.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!