महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ जानेवारी २०२२) : नुकताच २०२१ वर्ष संपन्न झाले असून २०२२ वर्षाला प्रारंभ झाला आहे. २०२०-२१ या वर्षात जगभरात कोरोनाने थैमान घातला होता. ज्यामुळे अनेक मोठ मोठ्या स्पर्धा स्थगित करण्यात आल्या होत्या. याचा आनंद पिंपरी चिंचवडकरांनी घेतल्याचे आज पहायला मिळाले, निमित्त होते सांगवीत होणारे रोमहर्षक आमदार चषक क्रिकेट सामने…
२०२२ या नववर्षात क्रिकेट रसिकांसाठी मा.नगरसेवक शंकरशेठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेट प्रेमी खेळाडूंना भरपूर मेजवानी आहे. या वर्षात एकूण ९२ संघात आमदार चषक क्रिकेट स्पर्धा होत आहेत.
आज तिसऱ्या दिवशी (रविवारी ०२ जानेवारी ) सकाळी ०८ वाजता नवी सांगवीतील PWD मैदानावर पत्रकार आणि पोलिस संघात क्रिकेट चा सामना पाहायला मिळाला. यात पोलिस संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी चा निर्णय घेतला, या झालेल्या रोमहर्षक सामन्यात पत्रकार संघाचे चुरशीची लडत दिली, यात पत्रकार संघास दोन फलंदाजाणा बाद करण्यात यश आले, यात कर्णधार मिलिंद संधान यांस एक विकेट मिळाली, तसेच फलंदाजीत पत्रकार संघाचा एकही खेळाडू बाद झाला नाही.
या खेळात उत्तम फलंदाजी व गोलंदाजी आणि उत्तम क्षेत्ररक्षण करत पोलिस संघाने अखेर विजयश्री आपल्याकडे खेचून आणला ३५ धावा करत पोलीस संघाचे खेळाडू दिलीप जाधव यांना मॅन ऑफ द मॅच जाहीर झाली.
चिंचवड विधानसभेचे ‘आमदार लक्ष्मणभाऊ जगताप’ यांच्या वाढदिवसानिमित्त फुल पिच टेनिस बॉल आमदार चषक क्रिकेट स्पर्धाचे आयोजन माजी नगरसेवक ‘शंकरशेठ जगताप’ यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी येथील पी डब्लू डी मैदान येथे करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड शहरात प्रथमच स्टंप मध्ये live कॅमेरा ची सोय उपलब्ध करण्यात आली आहे हे या सामन्यांचे वैशिष्ट्य आहे. या आयोजनात अजय दुधभाते, निलेश जगताप तसेच मनीष कुलकर्णी यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे दिसून येत होते.
आमदार चषक क्रिकेट सामन्याचे लाईव्ह थेट प्रेक्षपण http://Www.criclife.in अजयदादा दुधभाते,दिपक मंडले सर,प्रदिप गुळमिरे सर्व टीम यांनी अगदी साजेसे असे केले आहे,त्यामुळे क्रिकेट प्रेमींनी घरात बसून खेळाचा आनंद घेतला.